बिलोली ; प्रतिनिधी
कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार माध्यमिक विद्यालय कुंडलवाडी ता.बिलोली जि. नांदेड येथे आज फिट इंडिया मोहिम अंतर्गत उपक्रम राबविण्यात आला.
दि.२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत फिट इंडिया मोहिमेंतर्गत आज गाईडर सौ.सारिका मद्दलवार यांनी फिट इंडिया मोहिमेची माहिती, नियमित व्यायामाचे फायदे सांगितले.गाईडर विद्यार्थीनी शिवानी मोकमवार,संजना ब्यारमवार , अंजली कलमुर्गे यांनी आसने व सुर्य नमस्कार प्रात्यक्षिक कृतीतून करून दाखविले.गाईडर सौ.वर्षा येनगे यांनी सुर्यनमस्काराचे फायदे सांगितले.याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.कल्याण गायकवाड सर व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.चेटलूरे सर व विद्यार्थीनी उपस्थित होते.