1 min read

खासदार प्रताप पाटील चिखलीकर कोणाच्याही कामाचे श्रेय घेण्यात पटाईत — मा.आ.शंकर अण्णा धोंडगे

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना अरोग्य केंद्रास  मजुरी का मिळाली नाही—शंकर अण्णा धोंडगे यांचा चिखलीकर यांना सवाल कंधार ;मो.सिकंदर लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत असताना तत्कालीन आमदार तथा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून या मतदारसंघात नव्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना तर सहा उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असल्याचा दावा खासदार प्रताप […]

1 min read

नांदेड शहर गोळीबार प्रकरणातील चार आरोपी ताब्यात, दोन फरार;पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची माहिती.

नांदेड ; नांदेड शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या जुना मोंढा या ठिकाणी गोळीबार करून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या सहा पैकी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली. रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास जुना मोंढा भागातील तारासिंग मार्केटमधील दुकानदारांना गुंडांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार करून लुटण्याची […]

1 min read

आश्विन पौर्णिमेनिमित्त डॉ. आंबेडकर नगरात विविध कार्यक्रम

नांदेड – ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित काव्यपौर्णिमा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंधरा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या वर्षातील एकूण सहा काव्यपौर्णिमा आॅनलाईन घेण्यात आल्यानंतर सातवी काव्यपौर्णिमा प्रत्यक्ष बुद्ध विहारात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करुन व खबरदारी घेऊन साजरी करण्यात आली. […]

1 min read

शिक्षक सेना नांदेडच्या ऑनलाईन सभासद नोंदणीस प्रारंभ!

            नांदेड –  महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेची ऑनलाईन गुगल मीट आढावा बैठक व आॅनलाईन सभासद नोंदणी लिंकचे उदघाटन  सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. डाॅ. गोविंद काळे (मराठवाडा अध्यक्ष )  तर प्रमुख उपस्थिती  सन्माननीय राज्याध्यक्ष  तथा अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष ज.मो .अभ्यंकर साहेब  (राज्यमंत्री दर्जा ) आॅनलाइन गुगल […]

1 min read

शिवराज्य संघटनेच्या नायगाव तालुका अध्यक्ष पदी भाऊसाहेब पा.चव्हाण तर उपाध्यक्ष पदी शिवाजी पा. शिंदे यांची निवड

नायगाव प्रतिनिधी : शिवराज्य संघटनेची नायगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नायगाव तालुका कार्यकारणी स्वराज्य युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जाहीर केली आहे नायगाव तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब पाटील चव्हाण तर उपाध्यक्षपदी शिवाजी पाटील शिंदे यांची या बैठकीत निवड करून त्यांना नियुक्ती पत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात […]

1 min read

मुंबई उपनगरात लवकरचं गृहनिर्माण; सम्यक मैत्रेय फौंडेशन चा पाठपुरावा

मुंबई ; (प्रतिनिधी) येथील वेगवेगळ्या उपनगरात अल्पदरामध्ये गृहनिर्माणसाठी मागील काही वर्षापासून सम्यक मैत्रेय फाउंडेशन या एनजीओ च्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे, जमीन हस्तांतरण प्रक्रिया येत्या वर्षात पूर्ण होणार आहे.अशी माहिती प्रसिद्धि पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.             गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, मुलुंड व दहिसर परिसरातील सरकारी जमिनीवर गृहनिर्माण करण्यासाठी मागील काही वर्षांपासून […]

1 min read

घागरदरा येथे अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भुमिपुजन

कंधार :हनमंत मुसळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त तालुक्यातील मौजे घागरदरा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने दि.५ रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित स्मारकाचे भुमिपुजन संत एकनाथ महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे स्मारक उभारण्याचा घेतलेला निर्णय उल्लेखनिय असून साधू-संतानी दिलेल्या शिकवणीचा वसा अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकातून […]

1 min read

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ मराठवाडा प्रांत कार्याध्यक्ष पदी महंत श्री एकनाथ नामदेव महाराज उम्रजकर यांची बिनविरोध निवड

कंधार ; दिगांबर वाघमारे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळमराठवाडा प्रांत कार्याध्यक्ष म्हणून महंत श्री एकनाथ नामदेव महाराज उब्रजकर व सल्लागार महंत श्री नराशाम महाराज येवतीकर यांची निवड मराठवाडा प्रदेश अध्यक्ष महंत श्री महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी सर्वानुमते केली आहे. कुशल संघटक, चारित्र्य संपन्न व्यक्तित्व, प्रभावी वक्तृत्व, उत्तुंग कर्तृत्व ,वारकरी विचारांना समर्पित जीवन असणाऱ्या गुरुवर्य महंत […]

1 min read

तरुणांचे ‘नेतृत्व व आस्था ‘ मारोती मामा गायकवाड

कंधार तालुक्यात चळवळ ,बहुजनाचा आवाज बनून दिवस रात्र सेवा बजावत मारोती मामा गेल्या अनेक वर्षापासून आपले नेटाने पुढे चालवत आहेत.मामा मित्र मंडळाची स्थापना करुन नांदेड जिल्हातील तरुणांचा आवाज बनण्याचे काम मित्र मंडळाच्या स्थापनेतून साधण्याचे ठरवून मारोती मामानी सेवेचा श्रीगणेशा केला. आज कंधार लोहा तालुक्यातील बहूजनाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मारोती मामा नेटाने करत आहेत.कोणत्याही गावातील […]

1 min read

राज्यत २० ऑक्टोबरपासून विविध रेल्वे गाड्या सुरू होणार, १५ ऑक्टोबरपासून बुकिंग करता येणार?

मुंबई; राज्य सरकारने अनलॉक ५ मध्ये राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी सेवेला परवानगी दिल्यानंतर येत्या २० ऑक्टोबरपासून विविध रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. तसे नियोजन रेल्वेने केले आहे. या रेल्वे गाड्यांसाठी १५ ऑक्टोबरपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. सुरू होणाऱ्या गाड्या अशा मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्स्प्रेस),मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ, मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस,मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया (विदर्भ एक्स्प्रेस), […]

1 min read

आमची जनगणना आम्हीच करणार — लोकजागर अभियान

ओबीसी जनगणना सत्याग्रह: १८ ऑक्टोबर २०२०, रविवार पासून राज्यभरात सुरू… ओबीसींची शेवटची जातनिहाय जनगणना १९३१ ला इंग्रज सरकार तर्फे करण्यात आली. १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी ओबीसी समाजाला सामाजिक स्वातंत्र्य मात्र अजूनही मिळालं नाही. वारंवार मागणी करून देखील गेल्या ९० वर्षांपासून ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही. १९३१ च्या […]

1 min read

उत्तर प्रदेश बलात्कार प्रकरणी आरोपींना तात्काळ फाशी द्या : प्रदीप पाटील हुंबाड

नांदेड प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका १९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने राष्ट्रपती श्री रामनाथ गोविंद साहेब यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत लेखी निवेदनाद्वारे केली आहे वरील घटनेचा मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका युवतीवर […]