प्रतिनिधी, (दिगांबर वाघमारे )
भा.प्र.से तथा परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती,कंधारचा स्वतंत्र पदभार नुकताच स्वीकारला.आज दि 31 डिसेंबर रोजी शिक्षण विभागाचा आढावा घेतला.निपूण महाराष्ट्र, मुख्यमंत्री माझी शाळा अभियान शंभर टक्के नोंदणी बद्दल समाधान व्यक्त केले.
अनन्या रेड्डी या भारतीय प्रशासन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील सहायक जिल्हाधिकारी आहेत. त्यांची परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी म्हणून नांदेड या
जिल्हा प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी पदभार स्विकारला.त्या ४ आठवडे गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कंधारचा स्वतंत्र पदभार सांभाळणार आहेत. त्यांचा २९ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ पर्यंत प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे.आज 31 डिसेंबर रोजी शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी वसंत मेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख प्रवीण पाटील शिक्षण तज्ञ आनंद तपासे, मुख्याधापक वाघमारे डी.जी. यांच्यासह शिक्षण विभागातील पदाधिकारी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी उपस्थित होते.

