नांदेड ; नागोराव कुडके
महावितरण’च्या नांदेड शहर विभागांतर्गत येणाऱ्या विद्युत भवन,देगाव, सांगवी व चौफाळा ३३ केव्हीउपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या वीजवाहिनीवरील देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे
३३ केव्ही विद्युत भवन उपकेंद्रातून विज पुरवठा होणाऱ्या मेहबूब नगर, शिवनगर, सखोजी नगर, लक्ष्मी नगर, विद्युत भवन परिसर, दत्तनगर स्टेडियम परिसर, आय टी एम कॉलेज परिसर, साठे चौक परिसर, नवा मोंढा, नमस्कार चौक व एमजीएम कॉलेज इत्यादी परिसर तसेच ३३ केव्ही देगाव वीज वाहिनीवरील देगाव साखर कारखाना परिसर, हनुमान मंदिर परिसर त्याचबरोबर ३३ केव्ही सांगवी वीज वाहिनीवरील तरोडा बुद्रुक, सांगवी, चैतन्य नगर, विमानतळ परिसर आणि ३३ केव्ही चौफळा वीज वाहिनीवरील चौक परिसर, चौफळा परिसर, जुना गंज परिसर व सोमेश कॉलनी आदी भागाचा वीज पुरवठा गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे.