मुखेड:. ( दादाराव आगलावे)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड.खुशालराव पाटील उमरीकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे माजी सभापती अॅड. बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर, सरपंच बालाजी बोइनवाड, उपसरपंच संतोष पाटील, सामाजीक कार्यकर्ता अशोक बोईनवाड, पत्रकार गुरुनाथ पेंढारकर, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष एडवोकेट सुभाष पाटील इंगळे यांनी करताना म्हणाले की, आमदार डॉ. तुषार राठोड यांनी भगणूर सारख्या एका खेडेगावांमध्ये सभामंडपासाठी निधी देऊन भव्य मंडप ग्रामवाशीयांसाठी खुले करुन दिले आहे ही भुषणावह गोष्ट आहे.
महर्षी वाल्मिकीच्या जीवनचरित्रातून सर्वांनी आपल्या जीवनात चांगला बदल घडवून आणावा जीवनात परिवर्तन घडवून आणावे,भगवंताच्या नामाचे स्मरण करावे नाम संकीर्ण किर्तन करावे व आपला उद्धार करून घ्यावा अशीही एडवोकेट सुभाषराव भगणूरकर म्हणाले. आमदार डॉक्टर तुषार राठोड म्हणाले की, महर्षी वाल्मिकी चा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.
वाल्याचा वाल्मिकी झाला तसेच सर्वांनी आपल्यातील अवगुन टाकून द्यावे व सद्विचार सदविवेक बाळगावा हीच अपेक्षा मी ग्राम वाशीयाकडून करतो व हा सभामंडप सर्वांसाठी खुला करून देतो असे आमदार राठोड म्हणाले.
कार्यक्रमास रामदास चिकटवाड, देविदास झिंकवाड, माजी उपसरपंच संतोष झिंकवाड, सामाजिक कार्यकर्ता अशोक बोईनवाड, जयसिंग मेथेवाड, धोंडीबा झिंकवाड, परमेश्वर फिरंगवाड, धोंडीबा मेथेवाड, आत्माराम बोईनवाड, माधव मेथेवाड, उत्तम बोईनवाड, हनमंत चिकटवाड, मष्णाजी राहूलवाड, गोविंद पिलेवाड, हणमंत बोईनवाड, प्रसराम झिंकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.