कंधार ( धोंडीबा मुंडे )
कंधार येथील प्रति भगवानगड येथे राष्ट्रसंत भगवान बाबा श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमाचे दि.१७ मार्च २०२४ रोजी दुपारी ११ वाजून ५५ मिनिटांनी आयोजन केले असून या कार्यक्रमात कळस पूजा भगवानगडाचे महंत न्यायाचार्य ह.भ.प नामदेव शास्त्री सानप महाराज यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमास माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजीत पत्रकार परिषदेत भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.दिनकर जायभाये यांनी सांगितले.
भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठाणच्या वतीने वतीने दीड एकर परिसरात या मंदिराची भव्य उभारणी केली असून शहरातील एक प्रशस्त व धार्मिक स्थळ निर्माण झाले आहे,समाजातील अनेक दानशूर व्यक्तीने सढळ हाताने मदत केल्यामुळे वर्षभरातच या मंदिराची निर्मिती झाली आहे. या परिसराचा विकास करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी पुढे येत असून येणाऱ्या काळात या परिसराचा कायापालट होणार आहे .या परिसराचा विकास झाल्यानंतर पवित्र धार्मिक स्थळ म्हणून उदयाला येणार तर आहेच सोबतच या ठिकाणी तालुक्यातील सर्व समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अभ्यासिका तयार करणार असल्याचा मानस विश्वस्तांनी बोलून दाखवला आहे. तसेच धार्मिक शिकवणीची सुद्धा व्यवस्था करण्याची विश्वस्तांची तयारी आहे,
या दिवशी सकाळी कंधार शहरात बसस्थानक ते शिवाजी चौक मार्गे प्रतिभगवानगड न्यायाचार्य नामदेव शास्त्री सानप महाराज यांची रथयात्रा व कलश मिरवणूक निघणार आहे,तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे असे भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठानचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे सचिव डॉ.रामचंद्र गुट्टे,प्रा.नारायण मुंडे,माधव मुसळे, सहसचिव शरद मुंडे, बाळासाहेब गर्जे,ज्ञानेश्वर कागणे,उत्तम केंद्रे,रत्नाकर केंद्रे, दत्ता मुंडे,संग्राम कांगणे, संग्राम जायभाये,अजित केंद्रे यांच्या उपस्थित होते.
भगवान गड येथे मुर्तीं प्राणप्रतिष्ठा कलशारोहण कार्यक्रमास गुरु एकनाथ नामदेव महाराज, गुरु अवधूत गिरी महाराज, गुरु ज्ञानेश्वर साधु महाराज ,गुरु गयबी महाराज, विश्वधर्मी वि.दा. कराड,ह.भ.प.माधव महाराज केंद्रे,ह.भ.प. नामदेव महाराज दापकेकर,ह.भ.प. तुकारामशास्त्री मुंडे महाराज, ह.भ.प. वासुदेवशास्त्री मुंढे महाराज, ह.भ.प. मनोहर महाराज आळंदीकर, ह.भ.प. देविदास महाराज गिते चोंडीकर,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.भागवत कराड, महाराष्ट्राचे मंत्री ना.धनंजय मुंडे,ना.संजय बनसोडे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण खा. प्रतापराव पा चिखलीकर खा. सुधाकरराव शृंगारे, खा. प्रीतम ताई मुंडे, खा. डॉ अजित गोपछडे, आ. श्यामसुंदर शिंदे आ. डॉ. तुषार राठोड, आ. रमेश आप्पा कराड ,राम पा. रातोळीकर ,आ.मोहनराव हंबर्डे ,आ.माधवराव जवळगावकर, आ. राजेश पवार आ.भीमराव केराम,आ. जितेश अंतापुरकर, आ. रत्नाकर गुट्टे ,आ. संतोष बांगर, आ.किशोर दराडे, आ. नरेंद्र दराडे, आ. सौ मनीषा कायंदे ,आ. सुहास कांदे, आ. संजय दौंड, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंदराव कराड, माजी आ. गोविंदांना केंद्रे, माजी आ. शंकर अण्णा धोंडगे,माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी आ. गुरुनाथराव कुरुडे, माजी आ. मोहन फड, माजी आ.रोहिदास चव्हाण, माजी आ.गजानन घुगे, माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, मा.जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे, भाजपा नेते देविदास भाऊ राठोड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले ,राकाॅंचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, अशोक काका केंद्रे अहमदपूर, गोवा येथील बिल्डर दिनकर पाटील शेप,उमेश मुंडे, सोपानराव केंद्रे ,गुत्तेदार वैजनाथ सादलापुरे, एकनाथ दादा पवार, प्रा. डॉ.पुरुषोत्तम धोंडगे, दिनकर दहिफळे ,पंढरीनाथ केंद्रे, संभाजी पाटील केंद्रे, बालाजी पांडागळे ,अरविंद नळगे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.