कंधार
जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ मानले जाते.गुरु-शिष्य परंपरा आठवली की,एकलव्य आणि अर्जुन शिष्य अन् गुरु म्हणजे द्रोणाचार्य यांनी शिष्य एकलव्यास डाव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागीतला. हे पौराणिक कथेत आपण पाहत आलो.
पण आज गुरुदेव माजी प्राचार्य डाॅ.सुभाषरावजी नागपूर्णे सरांनी काल परवा म्हणजे १३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात कोरोना काळात कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईक यांच्यासाठी सुरू केलेला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार विद्रोही विचारवंत,मातृभक्त डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकीतून मानवता धर्म जोपासणारा “भाऊचा डबा” हा उपक्रम १,००० दिवसाचा पल्ला गाठल्याबद्दल संयोजक श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब यांचा सत्कार अनोख्या पध्दतीने १,००० हा आकडा डबा माध्यम वापरुन सुंदर कल्पक ट्राफी देवून सत्कार केला.त्या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान माजी प्राचार्य डाॅ.सुभाषरावजी नागपूर्णे होते.त्यांच्याच समर्थ हस्ते यथोचित सत्कार केला.
२० वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील प्रस्तावित लोहमार्गाचा नकाशा रेखाटून ५०० च्यावर केंद्रीयमंत्री व अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्यातील मंत्री आणि अधिकारी यांना पाठवून मागणी केली होती.डाॅ .भाई धोंडगे साहेब यांचे सहकारी आणि जयक्रांतिचे खंदे पाईक म्हणजे माझे गुरुवर्य,माझे आदर्श,माझ्या लिखानाचे कौतुक करणारे व्यक्तीमत्व, प्राथमिक शिक्षक ते वनस्पती शास्त्रात विद्यावाचस्तपती ही उपाधी अन् डाॅ.भाई मुक्ताईसुताचा विश्वास संपादन करुन,श्री शिवाजी काॅलेज शिवाजीनगर कंधार या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले.गुरुवर्य माजी प्राचार्य डाॅ.सुभाषरावजी नागपूर्णे सरांनी आज संकष्टी चतुर्थी निमित्त सायंकळी माझ्या कल्पकतेचा अभिनव नगरातील नागपूर्णे निवासस्थानी सत्कार रु.२००१ देवून सत्कार करतांना खंदारी वात्रटिका, कंधारी आग्याबोंड व शब्दबिंब या सदराचे कौतुक केले.या प्रसंगी गुरुवर्य डाॅ.सुभाषराव नागपूर्णे सरांच्या अधिश्वरी सौ.ज्योतीताई सुभाषरावजी नागपूर्णे ताई,त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालय लोहा येथील कार्यरत प्रा.संदीपजी नागपूर्णे सर त्यांच्या भार्या साक्षी संदीपजी नागपूर्णे ताई अन् चिमुकली अधिरा नागपूर्णे उपस्थित होते.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार