डॉ.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने फसव्या जागेचा लोकार्पण सोहळा थांबवा अन्यथा सामूहिक आत्मदहन इशारा

 

(कंधार संतोष कांबळे )

शहरातील महाराणा प्रताप चौक कंधार नगरपालिकेच्या जागेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे हा राज्य महामार्गावर दर्शनी भागात बसवावा त्यासाठी सकल मातंग समाजाची गेल्या अनेक महिन्यापासून लढत आहे महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पासून जाणारा हा रस्ता महामार्ग आहे या रस्त्यावरील शॉपिंग सेंटर न.प.च्या मोकळ्या जागेत बांधून हा रस्ता शंभर फुटाचा करावा व अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शन भागात आणावा ही पूर्वीपासूनच मागणी आहे या मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल सादर करण्याचे आदेश ही दिले होते असे असताना राजकीय नेते समाजाच्या काही नेत्याला हाताशी धरून मूळ मागणी बाजूला ठेवून पुतळा स्थलांतरित करण्याचा कट्ट रचित आहेत तत्कालीन तहसीलदार तथा मुख्याधिकारी यांनी तसेच कार्याला समोर पुतळ्यासाठी १५०० स्क्वेअर फुट जागा देत असल्याचे पत्र दिले आणि नमुना नंबर 43 उताऱ्यावर 800 स्क्वेअर फुट करण्यात आली आणि पुतळा स्थलांतरित करण्यासाठी वादग्रस्त जागेवर लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा लोकार्पण सोहळा थांबवा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे.

 

राजकीय नेते समाजाच्या तथाकथित नेत्यांना हाताशी धरून पुतळ्याच्या जागा बदलण्याचा कट रचत आहेत त्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याची जागा न बदलता जागेत व दर्शनी भागात हा पुतळा बसवावा यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, तहसील कार्यालय कंधार यांच्याकडे निवेदने देण्यात आली होती वारंवार निवेदन देऊनही त्यावर कोणताही आक्षेप न घेता वादग्रस्त जागेचे लोकार्पण होत असल्यामुळे सकल मातंग समाजाच्या वतीने सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला.
वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत रस्ता १०० फुटाचा करून डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी बसवावा यासाठी सकल मातंग समाजाची मागणी होती परंतु राजकीय दबावापोटी समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून तहसील कार्यालयासमोर डॉ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा स्मारकास व पुतळ्यास जागा देण्याचे काही लोकांकडून दवा केला जात आहे स्मारकासाठी देण्यात आलेली जागा ही सकल मातंग समाजाला मान्य नसून सदरील जागेत पुतळा स्थलांतरित करण्यात येऊ नये या संदर्भात मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड, तहसील कार्यालय कंधार, नगरपरिषद कंधार यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन देऊनही त्या वादग्रस्त जागेवर दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी लोकार्पण होत असल्यामुळे आम्ही सकल मातंग समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थलांतर होऊ देणार नाही लोकार्पण सोहळा रद्द करून समाजाचे होणारी दिशाभूल थांबावी अन्यथा 29 फेब्रुवारी 2024 रोजी तहसील कार्यालय समोर आम्ही महेंद्र अशोकराव कांबळे, बालाजी किशन कांबळे,प्रदीप दगडू इंगळे, श्याम बालाजी गडंबे यांचे सही असलेले निवेदन तहसील कार्यालय,समोर आत्मदहन करू अशा स्वरूपाचे निवेदन नगरपरिषद कार्यालय कंधार, तहसील कार्यालय कंधार येथे देण्यात आले आहे या निवेदनाच्या प्रतिलिपी मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड, पोलीस निरीक्षक कंधार, यांना पाठवण्यात आलेल्या आहेत.

चौकट
——————————————-
राजकीय नेत्याकडून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची जागा बदलण्याचा कट असून
वादग्रस्त जागा नियोजित व्यापारी संकुलनासाठी असून त्याचे नकाशे व मंजुरी सुद्धा नगरपालिकेत व वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत याही ऊपर सदर जागा ही नियोजित व्यापारी संकुलनातील रस्त्यावर येत असल्याने हे सर्व समाज बांधवांची विंचलित करण्याचे कार्य स्थान काही राजकीय नेते करत असून समाजामध्ये ते निर्माण करण्याचे कार्य प्रशासन करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *