प्रधानमंत्री पोषण शक्‍ती निर्मााण योजनेअंतर्गत शाळास्‍तरावर करावयाच्‍या कार्यवाहीबाबत.* *योजनेच्‍या प्रभावी अंमलबजावणीबाबत.

जाक्रं/पंसक/गशिअ/पीएमपोषण/ आस्‍था-०१/1604/ 2024
शिक्षण विभाग ,पंचायत समिती कंधार
*दिनांक: 18 /11/2024*

*मुख्‍याध्‍यापक सर्व,*
*जिपप्राशा/जिपहा/खाजगी अनु शापोआ पात्र शाळा सर्व,*
*पीएम पोषण शक्‍ती निर्माण योजना,पं.स.कंधार*.

*विषय : – *प्रधानमंत्री पोषण शक्‍ती निर्मााण योजनेअंतर्गत शाळास्‍तरावर करावयाच्‍या कार्यवाहीबाबत.*
*योजनेच्‍या प्रभावी अंमलबजावणीबाबत.*
*संदर्भ*:- १. मा.आयुक्‍त शिक्षण,महाराष्‍ट्र राज्‍य,पुणे यांचे पत्र क्रं ०६८७७ दिनांक १६.११.२०२४
२.मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जि पनांदेड यांचे पत्र क्रं ५७१४ दिनांक १२.०८.२०२४ (नविन मेनु)
३.मा.शिक्षाणधिकारी प्रा, जि पनांदेड यांचे पत्र क्रं ८३९३ दिनांक १८.११.२०२४ (परसबाग बाबत)

वरील विषयी आपणास सुचित करण्‍यात येते की, शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्‍ये दिवाळी सुटीनंतर मा.आयुक्‍त शिक्षण,म.रा. पुणे यांनी दिलेल्‍या संदर्भिय पत्रातील सुचनेप्रमाणे दिनांक 18 नोव्‍हेंबर 2024 पासुन शाळा सुरु होत आहे.त्‍याअनुषंगाने शाळेच्‍या पहिल्‍या दिवसापुर्वी खालीलप्रमाणे कामे पुर्ण करुन घ्‍यावीत.जेणेकरुन शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी विदयार्थ्‍यांना शालेय वातावरण प्रसन्‍न वाटेल व सदर शैक्षणिक वर्ष आनंददायी व अभ्‍यासपुर्वक होण्‍यात मदत होईल. तसेच खालील दिलेल्‍या सुचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
*1.* पीएम पोषण योजनेचा लोगो,टोल फ्री क्रमांक शाळेच्‍या दर्शनी भागावार लावावा
*2.* योजनेच्‍या पाककृतीबाबतचा मेनु दर्शनी भागावर लावावा.माहे ऑगस्‍ट 2024 च्‍या सुधारित मेनुप्रमाणे आहार शिजवुन देण्‍यात यावा.याबाबत आपणास सविस्‍तर सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. (सदर पाककृतीचा मेनु यासोबत जोडण्‍यात येत आहे.)
*3.* शापोआ नोंदवही च्‍या नोंदी वेळीच अचुक नियमित घ्‍यावात.तसेच नोंदवहीमधील तांदुळ व धान्‍यादी मालाची शिल्‍लक व प्रत्‍यक्षातील साठा शिल्‍लक बरोबर असावा.तफावत असल्‍यास तपशील लिहावा.
*4.* शिजविलेल्‍या अन्‍नाचा नमुना एका डब्‍यात दुस-या दिवसापर्यंत ठेवावे.
*5.* पुरवठा करणा-या यंत्रणेकडून साहित्‍य घेताना पावतीवरील वस्‍तुप्रमाणे तपासुन वजन करुन घ्‍यावे.तसेच यापुर्वी आपणांकडे शिल्‍लक असलेली बारदाणे/गोणपाटे संबंधीत पुरवठा धारकांना परत करुन तशी पावतीवर नोंद घ्‍यावी.
*6.* शाळेमध्‍ये धान्‍य साठयाचा बफर स्‍टॉक किमान एक महिना राहील याची काळजी घेऊन पुढील दोन महिन्‍यासाठी लागणा-या तांदुळ व धान्‍यादी मालाची मागणी केंद्रप्रमुख यांच्‍यामार्फत मागणी करावी.
*7.* पुरवठा यंत्रणेकडून जितका माल पुरवठा झाला आहे तेवढा सर्वच्‍या सर्व माल आवश्‍यक नसताना उतरुन घेऊ नये.जितका आवश्‍यक आहे तितकाच उतरुन घ्‍यावा.तांदुळ व धान्‍यादी साहित्‍य ज्‍या गटासाठी ( ०१ ते ०५ व ०६ ते ०८ ) घेतलेला आहे त्‍याच गटातुन शिजविण्‍यात यावा व तशी नोंद घेण्‍यात यावी.
*8*. दररोज शाळा भरल्‍यानंतर एक तासिका संपल्‍यानंतर दैनंदिन गोषवारा काढून उपस्थिती प्रमानानुसार स्‍वत मुख्‍याध्‍यापक/शापोआ काम पाहणारे कर्मचारी यांनी धान्‍य मोजुन स्‍वयंपाकी तथा मदतनीस यांना स्‍वच्‍छ करुन शिजविण्‍यासाठी दयावे.
*9.* अन्‍न शिजविण्‍यासाठी असलेले किचनशेड नियमित स्‍वच्‍छ असावे.परिसर स्‍वच्‍छता,स्‍वयंपाकी भांडयाची स्‍वच्‍छता,पिण्‍याचे स्‍वच्‍छ पाणी इत्‍यादी बाबतीत काळजी घ्‍यावी.शापोआ साठा हा स्‍वच्‍छ ठिकाणी व व्‍यवस्‍थीत उंचीवर ठेवलेला असावा.तसेच आहार हा किचनशेडमध्‍ये शिजवावा
*10.* शाळेतील सर्व शिक्षकांनी भोजनाच्‍या वेळी उपस्थित रहावे.
*11.* आहारामध्‍ये दररोज मेनुप्रमाणे भाजीपाला वापरण्‍यात यावा तसेच आठवडयातील प्रत्‍येक शुक्रवारी इंधन व भाजीपाला तरतुदीमधुन पुरक पोषण आहार देण्‍यात यावा.
*12.* स्‍वयंपाकी तथा मदतनीस यांची देयके प्रत्‍येक महिन्‍याच्‍या २३ तारखेला सादर करावेत तसेच दरमहा ०१ तारखेला योजनेची देयके प्रपत्र-अ व पपत्र-ब तयार करुन केंद्रप्रमुख यांचेकडे देण्‍यात यावीत तसेच केंद्रप्रमुख यांनी सर्व देयके संकलित करुन दरमहा 02 तारखेस या कार्यालयास सादर करावेत.देयके वेळेवर प्राप्‍त न झाल्‍यास केंद्रशासनाच्‍या पोर्टलवर निरंक माहिती भरण्‍यात येईल व संबंधीत शाळेंनी शालेय पोषण आहार शिजविला नाही असे समजण्‍यात येईल.
*13.* पटसंख्‍येच्‍या प्रमाणात स्‍वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत असल्‍याची मुख्‍याध्‍यापक यांनी खात्री करुन घ्‍यावी.शालेय व्‍यवस्‍थापन समितीने नविन स्‍वंयपाकी नेमला किंवा कमी केला तर त्‍याबाबत सर्व अहवाल या कार्यालयास तात्‍काळ सादर करण्‍यात यावा जेणेकरुन संबंधीत स्‍वयंपाकी यांचे मानधन वेळेवर अदा करीता येईल.
*14.* शापोआ रेकॉर्ड रजिस्‍टर,बँक पासबुक,स्‍टॉक बुक तसेच विदयार्थ्‍यांची वजन व उंची,आरोग्‍य तपासणी विषयी सर्व इतर आवश्‍यक अभिलेखे अदयावत ठेवावेत.
P.T.O.
*15.* MDM SARAL PORTAL वर दररोज एमडीएम अॅप अथवा एमडीएम पोर्टलवर व्‍दारे लाभार्थी विदयार्थी (ताटांची संख्‍या-Meal Served) नियमितपणे संबंधीत काम पाहणारे मुख्‍याध्‍यापक/शिक्षक/कर्मचारी यांनी भरावी.ऑनलाईन माहिती न भरल्‍यास इंधन व भाजीपालाचे अनुदान मिळणार नाही याची सर्वस्‍वी जबाबादारी ही मुख्‍याध्‍यापक/संबंधीत काम पाहणारे कर्मचारी यांची राहील याची गांभीर्याने नोंद घ्‍यावी.
*16*. योजनेच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरल प्रणालीअंतर्गत एमडीएम पोर्टलमध्‍ये शाळा स्‍तरावरुन लाभार्थ्‍यांची माहिती दैनंदिन भरली जाते व ही माहिती केंद्र शासनाच्‍या Automate Monitoring System प्रणालीमध्‍ये दररोज अदयावत केली जाते.त्‍यामुळे शाळास्‍तरावर लाभार्थ्‍यांची माहिती दररोज एमडीएम पोर्टलमध्‍येभरली जाईल याीच दक्षता संबंधित काम पाहणारे कर्मचारी/मुख्‍याध्‍यापक यांनी घ्‍यावयाची आहे.तसेच शिविअ व केंद्रप्रमुख यांनी आपल्‍या केंद्र लॉगिनवरुन ती पडताळणी करुन तात्‍काळ संबंधीत मुख्‍याध्‍यापक यांना दररोज अवगत करावे.
*17*. सदल प्रणाली अंतर्गत एमडीएम पोर्टलवर योजनेअंतर्गत देण्‍यात येणा-या दैनंदिन लाभाची माहिती अदयावत करणे अनिवार्य आहे.
*18*. शिविअ/केंद्रप्रमुख यांनी योजनेचे कामकाज पार पाडणा-या शिक्षकांची बदली झालेली असल्‍यास योजनेचे कामकाज पाहणा-या शिक्षक/मुख्‍याध्‍यापक यांचा दुरध्‍वनी मांक शैक्षणिक वर्ष सुरु होण्‍यापुर्वी एमडीएम पोर्टलवर तालुकास्‍तरारुन अदयावत करुन घेऊन शाळा सुरु होण्‍यापुर्वी एमडीएम अॅप चालु करुन घ्‍यावा.
*19.* आपल्‍या बीट/केंद्रातील सर्व शाळांचे एमडीएम अॅप/ एमडीएम पेार्टल लॉगिन कार्यान्वित असल्‍याची खातरजमा करण्‍यात यावी.एमडीएम पोर्टलवरील लाभाच्‍या नोंदणी अभावी शाळांना अनुदानाचा लाभ न मिळाल्‍यास याची सर्वस्‍वी जबाबदारी संबंधितांची राहील.
*20.* केंद्रशासनाच्‍या दिलेल्‍या निर्देशानुसार पात्र शाळांनी दैनंदिन लाभार्थ्‍यांची माहिती त्‍याच दिवशी एमडीएम पोर्टलमध्‍ये भरली आहे किंवा कसे? याबाबत केंद्र लॉगिनवरुन केंद्रप्रुख यांनी दररोज खातरजमा करावी.याकरीता कोणत्‍याही प्रकारची Back Dated Data Entry भरण्‍याची सुविधा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन दिली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घेण्‍यात यावी.
*21.* आपल्‍या कार्यक्षेत्रातील शाळांमध्‍ये विदयार्थ्‍यांना योजनेचा लाभ दिला जात नसल्‍याबाबतची दैनंदिन माहिती केंद्र शासनाच्‍या Automate Monitoring System प्रणालीव्‍दारे संचालनालयास प्राप्‍त होत आहे.सदरची बाब गंभीर स्‍वरुपाची विदयार्थी योनेच्‍या लाभापासुन वंचित राहील्‍यास शिविअ/केंद्रप्रमुख यांनी संबंधित शाळेवर जावुन त्‍याच दिवशी अहवाल प्राप्‍त करुन घेऊन आवश्‍यक ती कार्यवाही तात्‍काळ करण्‍यात यावी.
*22.* मा.शिक्षााधिकारी प्रा.,जि प नांदेड यांच्‍या संदर्भिय पत्र क्रं ०३ मध्‍ये दिलेल्‍या सुचनेप्रमाणे आपल्‍या शाळेमध्‍ये परसबाग विकासित करणे आवश्‍यक आहे. यामध्‍ये दिलेल्‍या सुचनेनेचे काटेकोरपणे पालन करावे तसचे काही अडचण असल्‍यास त्‍यामध्‍ये दिलेल्‍या प्रपत्रामध्‍ये माहिती भरुन या कार्यालयास कळवावे. (सोबत संदर्भिय पत्र जोडण्‍यात येत आहे. )

उपरोक्‍त मुददा क्रमांक ०१ ते २२ मध्‍ये दिलेल्‍या सुचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी ही सर्व क्षेत्रीय अधिकारी (शिक्षण विस्‍तार अधिकारी व केंद्रप्रुख) यांची राहील.

 

*प्रतिलिपी*:-
१. मा.शिक्षणाधिकारी (प्रा),जिल्‍हा परिषद,नांदेड यांना माहितीस्‍तव सविनय सेवेत सादर.
२. मा.लेखाधिकारी,पीएमपोषण योजना,जिल्‍ह(प्रा),जिल्‍हा परिषद,नांदेड यांना माहितीस्‍तव सविनय सेवेत सादर.
३. शिक्षण विस्‍तार अधिकारी सर्व,यांना माहितीस्‍तव व आवश्‍यक त्‍या कार्यवाहिस्‍तव
४. केंद्रप्रमुख सर्व, यांना माहितीस्‍तव व कार्यवाहिस्‍तव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *