महादेवाच्या काठीचे मांडव उभारण्याचा खुदू शेख परिवाराला मान ; कंधार तालुक्यातील बारूळ येथे तिसऱ्या पिढीपासून परंपरा अजूनही चालू

 

(बारुळ;  गोविंद शिंदे)

कंधार तालुक्यातील बारूळ येथील हिंदू मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान आराध्य दैवत श्री शंभू महादेव प्रसिद्ध आहे जिल्ह्यातीलच नसून दूरवरपर्यंत नसलेली दुर्मिळ मूर्ती म्हणजे सिंहासनावरील महादेव पिंड असून सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेले आहे त्याचे कारणही तसेच आहे चैत्रशुद्ध एकादशीला येथील यात्रा ला प्रारंभ होतो या यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक सांस्कृतिक वारसा जपला जातो विशेष म्हणजे येथील महादेवाच्या काठीचे मांडव हे मुस्लिम समाजाचे खुदू शेख यांच्या परिवारातील तिसऱ्या पिढीपासून परंपरा अजूनही चालूच आहे त्यामुळे सामाजिक सलोखा जपणारी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे

चैत्र शुद्ध एकादशीला यात्रेनिमित्त गावात श्री महादेवाची काठी भगव्या वस्त्रात लपटलेली बसवण्यात येते त्यानिमित्त महादेव मंदिरात मांडव घालण्यात येतो त्याचा मान मागील तीन पिढ्यांपासून मुस्लिम बांधवातील स्वर्गीय शेख महबूब साहब शेख छोटू मिया यांच्यापासून सुरुवात झालेली असून तीच परंपरा शेख खुदु शेख रफिक छोटू मिया हे मनोभावाने काम करत आहे यात सर्व धर्म समभाव या उक्तीचा प्रत्यय येतो याच भगव्या काशाय काठीचा वस्त्र परिधान केलेल्या काढीची मानकरी यांच्या हस्ते विधीवत पूजा करून ती वाजनञी सह जय घोषात महादेव मंदिरात आणली जाते चैत्रशुद्धे द्वादशीला गावातील सर्व जाती धर्माच्या भक्ताकडून आंबिलीच्या नैवेद्यासह गूळ साखर दाखवले जाते व त्यानंतर यात्रेस प्रारंभ केला जातो

 

या आधीच्या काळात दुवादशीच्या शाहीर नरसिंह भैया ठाकूर शाहीर शेख अली साहेब व त्यांच्या कलगी तुरा भजनी मंडळ संचाच्या माध्यमातून आपली सेवा महादेवाच्या चरणी अर्पण करीत पारंपारिक लोकगीताच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचे काम करत असत पण ती लोककला शाहिरांच्या वृध्दापकाळामुळे कालांतराने खंडित झाली असूनही या यात्रेचा इतिहास सामाजिक सलोखा जपणारी बारुळची यात्रा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *