(कंधार ; दिगांबर वाघमारे )
आपली संस्कृती आपले विचार आपली परंपरा याचे पालन करणे व धर्माचे आचरण करणे हे सर्व हिंदूंचे आद्य कर्तव्य आहे हिंदूंनीच हिंदुत्व जपले पाहिजे असे प्रतिपादन श्री संत नामदेव महाराज संस्थान चे मठाधिपती गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज यांनी कंधार येथे राम जन्मोत्सव निमित्त आयोजित धर्मसभेत केले.
श्रीराम जन्मोत्सव निमित्त दि ६ एप्रिल रोजी कंधार शहरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या राम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात सकाळी नऊ वाजता नगरेश्वर मंदिर येथे श्री राम पादुका पालखीचे पूजन करण्यात आले दुपारी बारा वाजता श्रीराम मंदिर येथे श्री गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या हस्ते श्री राम लल्ला उत्सव मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली
,सायंकाळी चार वाजता गणाचार्य मठसंस्थान मुखेड चे मठाधिपती डॉ विरुपाक्ष महाराज यांच्या हस्ते शोभायात्रीची सुरुवात करण्यात आली सायंकाळी आठ वाजता या शोभायात्रेचे रूपांतर धर्मसभेमध्ये करण्यात आले या धर्मसभेत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती एकनाथ नामदेव महाराज ,गुरू गायबि नागेंद्र महाराज मठ संस्थान पानभोसी व त्रिपुंडाचार्य स्वामीजी नर्मदा तट देवस्थान यांची प्रमुख उपस्थिती होती या धर्मसभेस संबोधित करताना एकनाथ नामदेव महाराज म्हणाले की आपली संस्कृती ही नैतिक मूल्य जपणारी आहे त्यातून त्यातून सुसंस्कृत समाज निर्माण होतो आपली संस्कृती आपले विचार येणाऱ्या पिढीला देण्याकरिता सर्व पालकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे समृद्ध विचारातूनच समृद्ध राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पूर्ण होईल , प्रत्येक हिंदूंनी आपल्या संस्कृतीचे धार्मिक आचरण केले पाहिजे आणि ते आपले आद्य कर्तव्य आहे असे श्री संत नामदेव महाराज यांनी धर्मसभेच्या वेळी बोलताना म्हणाले या राम जन्मोत्सवाच्या विविध धार्मिक कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित, राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते या शुभयात्रेत तरुणाईचा आनंद उसळून वाहत होता तर या शुभयात्रीचे स्वागत जागोजागी नागरिकांनी मोठ्या आनंदाने केले तर हनुमानाचा जिवंत देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता