About

युगसाक्षी लाईव्ह न्युज वेब पोर्टल हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी माणसाच्या जगण्याची प्रेरणा अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी सुरु केलेली चळवळ आहे. ज्यात बातम्यांसह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कृषी, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील माणसाचा वावर, घटना घडामोडी, साहित्य, भूमिका, कार्यतत्परता, बांधिलकी आदींचा मागोवा घेतला जातो. या न्युज चॅनेलच्या केंद्रस्थानी ‘माणूस’ असून या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाच्या बळावर आम्ही या नव्या चळवळीला प्रारंभ करीत आहोत. ही नव्या जगाची हाक आहे, काळाची गरज आहे. अभिव्यक्ती, आविष्कार, अभिरुचींना वाव मिळवून देण्यासाठी मानवी कल्याणाचे सौंदर्य अधोरेखित करण्यासाठी युगसाक्षी ही वृत्तवाहिनी आपल्या सेवेत सर्वात आधी पोहोचण्यासाठी तत्पर आहे. यात अधिकाधिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने वाचकांच्या सूचनांचेही स्वागत आहे. युगसाक्षी लाईव्ह आपल्या मोबाईलवर तसेच लॅपटॉप किंवा संगणकावर सहज उपलब्ध होईल. आपण ते सबस्क्राईब,लाईक करावे आणि आम्हाला बळ द्यावे, ही विनंती.