कंधार ;( दिगांबर वाघमारे)
श्रीक्षेत्र घागरदरा ता. कंधार यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या तसेच नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. वर्षाताई संजय भोसीकर यांनी शंभू महादेव व संत महंत श्री एकनाथ नामदेव महाराज यांच्या दर्शनाने आपले भाग्य लाभल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी संत महंतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आगामी लोकसेवेसाठी आशीर्वादही घेतला.
या प्रसंगी सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे, संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर, संग्राम पाटील नावंदे यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
फुलवळ गणासाठी जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिला राखीव सुटला असून, या पार्श्वभूमीवर सौ. वर्षाताई संजय भोसीकर या संभाव्य जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जोरदार दावेदार मानल्या जात आहेत. तसेच नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचेही आरक्षण ओबीसी महिला वर्गासाठी जाहीर झाल्याने त्यांचे नाव अधिक चर्चेत आले आहे.
लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे काम पुढेही अखंड सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.


