भक्ती लॉन्स, मालेगाव रोड येथे एकनाथ कल्याणकर, सुहास कल्याणकर , योगेश मुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिराला उदंड प्रतिसाद
नांदेड : ( दिगांबर वाघमारे )
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक विकासाची आणि भौतिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. ती सतत सुरूच राहतील मात्र आता जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी काम करण्यात येणार आहे. यासाठी रोगमुक्त संगीतमय योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे . या रोगमुक्त योग शिबिरातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे आरोग्य अधिक चांगले ठेवण्याचा आमचा मानस आहे . त्यासाठी या आरोग्य शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बालाजी कल्याणकर यांनी केले आहे.
भक्ती लॉन्स येथे आज पहाटे पाच वाजता योग गुरु नांदेड भूषण सिताराम सोनटक्के यांच्या सानिध्यात सात दिवसीय मोफत रोगमुक्त संगीतमय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवशीय योग शिबिराचे उद्घाटन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते.
योग साधक आणि उपस्थितांना आशीर्वाद देण्यासाठी श्री. महंत 108 जीवनदासजी बाबाजी , हनुमान गड मठ संस्थान महंत श्री.गरुडदास त्यागी महाराज , गोविंद गुरुजी महाराज , हनुमान गडचे मुख्य पुजारी अर्जुन महाराज यांची उपस्थिती होती .
यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासह आ. आनंदराव पाटील बोंढारकर , सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर ,सह संपर्कप्रमुख दर्शन सिंग सिद्धू, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे , जिल्हाप्रमुख विनय गिरडे , सामाजिक कार्यकर्ते जयंत वाकोडकर , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम , शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अपर्णाताई नेरलकर ,शिवसेना शहरप्रमुख श्याम कोकाटे, केरबाजी कल्याणकर , उत्तमराव कल्याणकर , संभाजीराव कोरडे , विश्वनाथ देशमुख, व्यंकटराव देशमुख , मधुकर देशमुख, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वनमाला राठोड , गीताताई पुरोहित , दीपाताई थोरवट , शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय पावडे , गणेश बोकारे , महानगर प्रमुख विवेकानंद रामकृष्ण उर्फ राजू गुंडावार ,केरबाजी कल्याणकर मा. चेअरमन, गंगारामबापू कोरडे, माधवराव महाराज हिंगमिरे , शक्ती सिंह ठाकुर , नवनाथ काकडे , डॉ. प्रतीक्षा धुतडे , यादवराव कल्याणकर , जी नागय्या , ॲड.श्याम बन, ॲड.धम्मपाल कदम, गणेश अप्पा हालकोडे, विकास देशमुख तरोडेकर,बळवंत तेलंग , शाम वानखेडे , देवानंद इंगोले, नवनाथ काकडे, मनमित कुंजीवाले,आदींची उपस्थिती होती .
या शिबिराचे आयोजन एकनाथ कल्याणकर , सुहास बालाजी कल्याणकर , योगेश उमेशजी मुंडे यांनी केले . योग समितीचे सोपान कदम , बालकिशन पसलवाड, महेश पांचाळ , विलास आप्पा कवठेकर, बजरंग घुगे, रूकमाजी मुदखेडकर, राज जनकवाडे , विनायक बारहत्ते, मकरंद पांगरकर, पंकज आईनेले , संजय लालपोतू , गंगाधर श्रीरामवार , मदन मेंडके, डुकरे योगाजी , नामदेव वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
योग शिबिरात सहभागी झालेल्या योग साधकांशी संवाद साधताना आ. बालाजी कल्याणकर म्हणाले की , नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत . आगामी काळातही नांदेड शहराचा भौतिक विकास मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. परंतु याचवेळी आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी योग शिबिर आयोजित करणे अत्यावश्यक होते . या योग शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दैनंदिन जीवनात व्यायाम करण्याची सवय लागावी , योग करण्याची सवय लागावी , यातून आपले आरोग्य तंदुरुस्त राहील. आपला मानसिक विकास होईल. यासोबतच आर्थिक उन्नतीचाही मार्ग सापडेल त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आठ दिवशीय संगीतमय योग शिबिराचा आपण लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान यावेळी बोलताना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर म्हणाले की, विकासाची कामे करत असताना संयोजकांनी येथे मोफत योग शिबिर आयोजित करून खऱ्या अर्थाने जनतेच्या सार्वजनिक आरोग्याची काळजी घेतली आहे . भौतिक सुखापेक्षा शारीरिक आरोग्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे . योग नाही तर सुखी आणि निरोगी आरोग्य नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनात निरोगी राहण्यासाठी आपण किमान एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.भल्या पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या योग शिबिराला नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची प्रचंड गर्दी होती. यात महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय राहिली आहे. येत्या 14 डिसेंबर पर्यंत रोगमुक्त संगीतमय योग शिबिर सुरू राहील अशी माहिती संयोजकाच्या वतीने यावेळी देण्यात आली.

