धर्मापुरी : आमचे प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची उद्या सकाळी म्हणजे दि 10 एप्रिल 25 रोजी एकसष्ठी आहे. सरांना प्रथमतः जन्म दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!! दुसरे म्हणजे, देव पहावयास गेलो आणि देवची होऊनी ठेलो . तुका म्हणे धन्य झालो ! आज विठ्ठला भेटलो !! असं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग आहे. आमचे प्राचार्य डॉ होळंबे टी एल सर हे माझ्यापेक्षा आठ – दहा वर्षे वयाने मोठे आहेत. गतवर्षी दि 10 एप्रिल 24 रोजी सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. तेंव्हा सरांचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. संस्थेने कालावधी वाढवून दिला आणि सर प्राचार्य म्हणून काॅलेजवर पुन्हा आले ! सर पुन्हा येऊन सुद्धा बघता बघता वर्ष संपून गेलं आहे. पण या वर्षी मात्र सर अधिक जोमाने कामाला लागले आहेत. विशेषता , होईल तेवढं लवकर नॅक करून घ्यावे. या भुमिकेत आणि याच मानसिकतेत आहेत.
नुकतेच माझ्या लक्षात आले आणि मी ठरवलं आहे की आपल्या लेखनातून आपण कुणाचे धिंडवडे काढायचे नाहीत तर, जर जमलं तर पिंडवडे मात्र काढायचे. म्हणजे सकारात्मक लिहायचे. कारण माणूस मुळात चांगलाच असतो. यावर आपला विश्वास हवा आणि तो माझा पण आहे. शिवाय असं सुद्धा म्हणतात की, No one is perfect. मग हे जर खरे असेल तर हा नियम माणूस म्हणून सरांना पण लागू होतोच ना !!!
गत दोन महिन्यांपासून मला सारखं सारखं वाटत होतं की आपण सरांना एक शाल पांघरावी . पण मला त्यासाठी सुद्धा एखादं निमित्त हवं होतं. ओघानं ते निमित्त पण पुढे आलं. कारण काही दिवसांपूर्वी मी महाविद्यालय गीत लिहिलो होतो . त्या गीताच्या भिंती पत्रकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी मात्र मला वाटलं की आपण आता सरांना नक्कीच शाल पांघरुया. पण सर ते सरच् !!!
सरांनी महाविद्यालय गीताच्या भिंती पत्रकाचा प्रकाशन सोहळ्याच्या अगदी सुरुवातीलाच सांगून टाकले की हार – तुरे, सन्मान – सत्कार, ही औपचारिकता बाजूला ठेवा. मी कोणताही हार आणि शाल घेणार नाही. सरळ कार्यक्रम सुरुवात करा. असी सुचना केली. यावरच थांबतील ते प्राचार्य कसले ? सर पुन्हा म्हणाले, आज मी तुझाच सत्कार करतो.!!! आणि त्यांनी खरोखरच आपण पुष्पहार न घेताच माझाच सत्कार केला. आणि आपसूकच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वरील अभंग माझ्या ओठांवर आला. तो म्हणजे, देव पहावयास गेलो आणि देवची होऊनी ठेलो !! तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो !!! अगदी असेच मी सरांचा सत्कार करायला गेलो आणि मी स्वतः च सत्कार घेऊन आलो.
आज बुधवार दि 10 एप्रिल 25 हा सरांचा जन्म दिवस. सरांना वाढदिवसाच्या किंबहुना एकसष्ठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. !!!
प्रा भगवान कि आमलापुरे.
फुलवळ
द्वारा कै शं गु ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी ता परळी वै जि बीड.
पिनकोड : 431515
संपर्क : 9689031328

