महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पीटल पर्यंत हा रस्ता 100 फुटाचा करून डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आणावा हि संकल मातंग समाजाची मुळ मागणी आहे परंतु राजकिय दबावा पोटी समाजाच्या तथाकर्षित लोकांना हाताशी धरून तहसिल कार्यालया समोर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास व पुतळ्यास स्थलांतराचा दावा करण्यात येत असून दि.29 फेब्रुवारी रोजी कंधार तहसिल समोरील मोकळ्या जागेचा लाकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदरील कार्यक्रम थांबवा अन्यथा सामुहीक आत्मदहनाचा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने मातंग समाजाचे तरुण महेंद्र अशोक कांबळे, बालाजी किसन कांबळे,प्रदिप दगडु इंगळे,श्याम बालाजी गंडबे या
चार तरुणांनी आज बुधवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता निवेदना द्वारे कंधार तहसिलदार यांना दिला आहे.
या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस निरीक्षक कंधार यांना देण्यात आली.