साठे युवा मंच तर्फे राज्य शासनाचे जाहीर आभार

 

मुंबई प्रतिनिधी:- काल झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या वतीने मातंग समाजाचा शैक्षणिक दृष्ट्या विकास होण्यासाठी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड संशोधन इन्स्टिट्यूट (ARTI) तसेच पुणे येथील क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारकासाठी 84 कोटी 11 लाख रुपयाचा निधी मिळालेला असून सदरील स्मारकाचे उद्घाटन येत्या 2 मार्च 2024 ला होणार असुन राज्यातील मातंग समाजाच्या तीस वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी साठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक लक्षवेधी आंदोलने करण्यात आली आहे.

 

या प्रमुख मागणीसाठी समाजाच्या अनेक राजकीय पदाधिकारी संघटनांनी विविध आंदोलन केलेली असून विविध संघटनाने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाने विधायक प्रलंबित प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करुन राज्यातील मातंग समाजाला न्याय दिलेला असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, नामदार अजित पवार, अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार,साठे आर्थिक विकास महामंडळाची मा अध्यक्ष अमित गोरखे, यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन करून आभार मानण्यात आलेले असून *.

 

राज्य शासनाने उपेक्षित साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत देशाचा सर्वोच्च असलेला भारतरत्न हा पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करावी* अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच संस्थापक अध्यक्ष डॉ सचिन साबळे, रमेश सोलसे, प्रवक्ता प्रा अनिल साबळे, प्रकाश मिसाळ, संतोष थोरात,सचिन आव्हाड, गजानन आव्हाड,विशाल मिसाळ, सचिन आव्हाड, प्रशांत साबळे, संतोष आव्हाड, प्रवीण आव्हाड,अंजली साबळे, राधा यंगड, स्नेहल साबळे, लता सोनवणे, माहेश्वरी साबळे,अशा मिसाळ, संगीता आव्हाड, माहेश्वरी मिसाळ, प्रीती साबळे, राणी मिसाळ,श्रुती साबळे, सुचिता सोळसे आदींनी राज्य शासनाकडे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *