कंधार : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अंशतः माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा पुढील व ढईव टप्पा जोपर्यंत जाहीर केला जाणार नाही.तोपर्यंत १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार असल्याचे निवेदन दि.२८ रोजी शिक्षक समन्वय संघ कंधार शाखेमार्फत कंधार तहसीलदार यांना दिले.
महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मिळावा यासाठी ३ जानेवारी पासून आजपर्यंत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू आहे.परंतू शासन या मागणीकडे लक्ष देण्यास तयार नाही.अंशत: अनुदानीत शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा १ जानेवारी २०२४ पासून देण्यात यावा.व प्रत्येक वर्षी अनुदानाचा टप्पा देवून शाळांना १०० अनुदानावर आणावे.यासाठी शिक्षक समन्वय संघ विविध आंदोलने करत आहे.
शासनाचे सर्व कामे अंशतः विनाअनुदानित शिक्षक जबाबदारीने पार पाडत असतात.परंतू शासन अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्य स टाळाटाळ करत आहे.जोपर्यंत अनुदानाचा वाढीव टप्पा दिला जाणार नाही.तोपर्यंत १० वी व १० वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार असेल.असे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनावर प्रा.भागवत गोरे,प्रा.सौ.विद्या सोनकांबळे,प्रा.शिवाजी मुंडे,प्रा.राम माने,प्रा.ज्ञानेश्वर लोंढे,प्रा.पांडुरंग वाघमारे,प्रा.महेशकुमार गव्हाणे, प्राचार्य एकनाथ मुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.