लोहा | प्रतिनिधी
आज गुंडेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिलीपदादा धोंडगे यांच्या संकल्पनेतून सौ. पुष्पाताई शिवराज धोंडगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, वह्यांचे संच आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास गुंडेवाडी येथील शालेय शिक्षण समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
सौ. पुष्पाताई शिवराज धोंडगे या कलंबर सर्कलच्या उमेदवार असून त्या माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या सुनबाई आहेत. समाजोपयोगी उपक्रमांद्वारे शिक्षणाला चालना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षकवृंदांनी केले.


