कळमनुरी येथील रोहिणी वाकडे साहित्य दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार आज घोषित करण्यात आले. कादंबरी, कथा आणि कविता लेखनासाठी दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी २०२४ मधील कादंबरी विभागात माझ्या ” वचपा ” कादंबरी या लेखन साहित्य कृतीची निवड करण्यात आली आहे.
येत्या १८ जाने २०२६ ला मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना एका सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील.. असे संयोजक विजय गं.वाकडे,प्रेरक दत्ता डांगे, कार्यवाह शंतनु वाकडे यांनी जाहिर केलेले आहे.
माझ्या वचपा कादंबरीस या वर्षातील हा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
माझ्या वचपा कादंबरीस पुरस्कार मिळाल्यामुळे नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी मला आनंददायी भेट मिळालेली आहे .
mr rathod

