कंधार : (दिगांबर वाघमारे )
माजी खासदार,आमदार,शिक्षणमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांचे शैक्षणिक, सामाजिक व राजकिय क्षेत्रातील काम वाखण्याजोग होते. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब, कष्टकरी, नाहिरेवाल्यासाठी काम केले. राजकिय क्षेत्रात काम करताना सर्व सामान्याची प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. म्हणून डॉ. भाई केशवराव धोंडगे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील रत्न ठरतात असे प्रतिपादन ह.भ.प.आदिनाथ महाराज लाड यांनी केले.दि.१ जानेवारी रोजी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त क्रांतिभुवन बहादरपुरा येथे हरी कीर्तनाचा कार्यक्रम सोहळा पर पडला. या प्रसंगी ते बोलत होते.
भाईंनी कधीच जाती व्यवस्था मानली नाही. सामाजिक कार्याबरोबरच ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी शैक्षणिक क्रांति निर्माण केली. गोरगरीबांच्या हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. म्हणून त्यांचे कार्य आजही समाजासाठी उपयोगी आहे.
भाईंसारखीमाणसं समाजातील गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कुणबी, नाहिरेवाल्याच्या उद्धारासाठी जन्माला येतात. समाज उपयोगी कार्य करा म्हणजे मानवी जीवन समृद्ध आणि सफल होईल असेही लाड महाराजांनी आपल्या मधुर वाणीतून स्पष्ट केले. भाईंनी आयुष्यभर गोरगरीब, सामान्य, आठरा पगड जातीसाठी गाव, वाडी, तांडयावरील जनतेसाठी कार्य केले. म्हणुन त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.
यावेळी भाईंच्या अर्धांगिनी चंद्रप्रभावतीबाई धोंडगे, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, ॲड. मुक्तेश्वर धोंडगे, प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, प्रा. डॉ. चित्राताई लुंगारे, प्राचार्य डॉ. अशोक गवते यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते. भाई केशवराव धोंडगे यांच्या समाधीस्थळी माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, एकनाथ दादा पवार, माजी जि.प.अध्यक्ष दिलिप पा. बेटमोगरेकर,
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धरमाधिकारी, नगराध्यक्ष शहाजी नळगे, माजी जि.प.सदस्य प्रणिताताई देवरे, तहसिलदार रामेश्वर गोरे, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, विधीज्ञ ॲड. बी. के.पांचाळ यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी,विविध विभागांचे अधिकारी कंधार लोहा तालुक्यातील नागरीक हजारो संख्येने उपस्थित राहून दिवंगत भाई धोंडगे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कंधार लोहा तालुका अंधमुक्त करण्याचा संकल्प केला होता. डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी नाहीरेवाल्यासाठी आयुष्यभर काम केले. आमदार व खासदार आसताना सामान्य लोकांसाठी जेलमध्ये गेले. पुढच्या काळामध्ये भाईंच्या नावाने सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा पार पाडणार आहोत. गोरगरीब सर्व समाजातील लोकांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जाईल.
– प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे
अध्यक्ष, श्री शिवाजी मोफत
एज्युकेशन सोसायटी कंधार

