#कंधार : ( दिगांबर वाघमारे )
कंधार नगरपालीका नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आज दि. 2 जानेवारी रोजी संपन्न झाला.पालिकेचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या हस्ते शहाजी अरविंदराव नळगे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला.
कंधार नगरपालिकेचा निवडणूक निकाल दि.22 डिसेंबर रोजी जाहीर झाला त्यात लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शहाजी अरवविंदराव नळगे हे जनतेतून निवडून आले. तेव्हा त्यांनी सोशल माध्यमा वरून सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी कंधार शहराच्या विकासासाठी सर्व मिळून काम करू असे जाहीर केले होते. परंतू दरम्यानच्या काळात नगरसेवकांची पळवापळवी, अपक्ष नगरसेवकांना पक्ष प्रवेश असे प्रकार घडले.परंतू शहाजी नळगे यांनी कसल्याच प्रकाराला न जुमानता नविन वर्षात 2 जानेवारी रोजी नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण करण्याचे ठरवले त्यानुसार आज दि.2 रोजी कंधार नगरपालीका कार्यालयात पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे देशमुख दिलीप यांना गटनेता म्हणून जाहीर करण्यात आले.
या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, कंधार तालुका काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष संजय भोसीकर,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते शिवाभाऊ नरंगले, माजी नगराधक्ष दगडूभाऊ सोनकांबळे, शिवसेना नेते प्रा.डॉ पुरुषोत्तम धोंडगे, यांच्यासह नगरसेवक बसवंते वैशाली ,पवार सुनिता,बनसोडे देऊबाई ,नळगे भास्कर,कांबळे सुधाकर,देशमुख दिलीप आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी ,कार्यकर्त उपस्थित होते.

