धर्मापुर ( प्रा भगवान आमलापुरे )
आपल्या तालूक्यातील मायेच्या व्यक्तिंना भेटून भारावून गेलो.माहेरची माणसं भेटल्याचा मनोमन आनंद झाला.असे प्रतिपादन डॉ रमाकांत गजलवार यांनी केले.
सोमवार दि २९ डिसें २५ रोजी वै धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर महाविद्यालयाची सहल धर्मापुरीहून परळी वैजनाथ मार्गे वेरुळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेली. या सहलीत ४० विद्यार्थी – विद्यार्थीनी दोन प्राध्यापिका आणि चार प्राध्यापक सहभागी झाले होते. तत्पुर्वी त्यांनी डॉ. गजलवार सरांशी फोनव्दारे संपर्क साधला. कै. शं. गु. ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयास भेट दिली.तेंव्हा त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते आपल्या मनोगतात म्हणाले की दहा वर्षापूर्वी एखाद्या सासुरवासीन सुनेला आपल्या गावाकडील नातलग अचानक भेटल्यावर जसा आनंद व्हायचा तो आनंद मला झाला आहे.आता सोशलमिडीया च्या जमान्यात नातलग रोजच फोनवर बोलतात दिसतात. ती ओढ काही वेगळीच होती. स्वागत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा डॉ पांडुरंग मामडगे यांनी केले. प्रा डॉ सौ एस डी मुंडे,प्रा जंगिटवार व्ही आर, प्रा डावरे व्ही आर, प्रा भगवान आमलापुरे, प्रा नरवाडे एम व्ही, कासीम शेख,दत्तू मुंडे,पेन्टूळे बी एस यांनी परिश्रम घेतले.

