कै. शंकरराव गुट्टे कॉलेज धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड येथील रसायनशास्त्र विभागातील संशोधक *डॉ. राजकुमार मोमले* यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी आपला संशोधन प्रबंध “Synthesis characterization and Antimicrobial activity of some new azole schiff base metal complexes ”
या विषयावर सादर केला. सदर संशोधन कार्य प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. व डॉ. बामु विद्यापीठाचे चेअरमन प्रो. डॉ. बापूराव शींगटे हे व प्रो. पी. पी. महुलिकर सर जळगाव विद्यापीठ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या संशोधनातून रसायनशास्त्र क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले असून यामुळे शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्राला निश्चितच लाभ होणार आहे.*डॉ. राजकुमार मोमाले* यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मार्गदर्शक डॉ. गोपाळ काकडे सर, तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. शिवाजीराव गुट्टे व प्राचार्य डॉ. टी. एल. होळंबे आणि सर्व सहकारी मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

