सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली.कदाचित क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शाळा काढली नसती तर.. सावित्रीबाई फुले या सुद्धा अशिक्षित राहिल्या असत्या? इतिहासामध्ये त्यांची नोंद पहिल्या अध्यापिका म्हणून झाली नसती? इंग्रजांचे भारतावर साम्राज्य पसरलेले असताना सुद्धा पुणे सारख्या शहरांमध्ये या दोघां पती-पत्नीनी समाजाला अंधःकार मय युगातून उजेडाकडे नेण्याचे धाडसी प्रयत्न केला.खरोखर महिला या अबला नसून त्या सबला आहेत. हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखविले आहे. सावित्रीबाई अतिशय निर्भीड धाडसी व शूर होत्या. अंगावर माती,शेण,दगड गोटे झेलले असले तरी त्या घेतलेला शिक्षणाचा वसा अर्धवट सोडल्या नाहीत. म्हणून त्यांच्या त्या कर्तृत्ववान शैक्षणिक, सामाजिक कार्य पद्धतीला विठू माऊली प्रतिष्ठानकडून मानाचा मुजरा..
आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने खरोखरच महिलांनी ‘चूल आणि मूल’ सोडून इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत.त्या अर्थार्जन करून कुटुंबाची घडी बसवत आहेत. “महिला या कोमल असतात, परंतु त्या कमकुवत नसतात” खरोखरच आज समाजातील स्त्रियांचे प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आजच्या महिलांनी आत्मनिर्भर बनावे. सर्वांशी मिळून मिसळून वागावे. भेदभाव कसलाही करू नये. म्हणून अनेक समाज सुधारकांनी त्यांच्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. अनेक वेगवेगळ्या शिक्षण संस्था काढून महिलांना शिक्षणाची दारे खुले करून दिली. त्यामुळे आज सुशिक्षित मुली जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरीच्या निमित्ताने जाताना दिसत आहेत. शिपाई पासून ते राष्ट्रपती पदापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत.अनेक सन्मानाची पदे त्यांच्याकडे चालून येत आहेत.अंतराळात जाण्याचा सुद्धा कल्पना चावला या अंतराळ वीर यात्रीने उपक्रम केला आहे.
राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील व द्रौपदी मुर्मु यांनी सर्वोच्च पदे भूषविले आहेत. पंतप्रधानपद प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी अतिशय निर्भीडपणे सांभाळले आहे. म्हणूनच आजच्या महिलांनी सुद्धा मोठमोठ्या पदे पादाक्रांत करण्यासाठी भरपूर परिश्रम करावे. आपल्या देशाचे मान उंचावेल असे कार्य करावे. निरक्षरता सोडून साक्षर होण्याचा प्रयत्न करावा.ज्या देशात निरक्षर महिला आहेत त्या समाजात वेडगळ समजुती,अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती, शकुन-अपशकुन यासारख्या प्रथांचा धुमाकूळ घातला जातो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला सारून समाजात व्रत-वैकल्ये वाढीस लागतील. पुरुष आणि महिला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून सर्व पुरुषांनी महिलांना समानतेची वागणूक द्यावी. कसल्याही पद्धतीने महिलांचा छळ होता कामा नये. अनेक कुटुंबातील महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करीत आहेत. त्यांनाही आज आपली नैतिक मूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता,व न्याय ही तत्वे समजत आहेत. एक पुरुष शिकला तर एकच घर सुशिक्षित होते. परंतु एक महिला शिकली; तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.
त्या काळातही त्यांनी योगदान दिले आहे. स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास करताना अनेक समस्याचे मूळ पुरुषांच्या मानसिकतेत दडले आहे.
आज आपण एकविसाव्या शतकात आलो तरीही या पुरुषी मानसिकतेतून आपली केव्हा सुटका होईल हे महिलांना निश्चित सांगता येत नाही.भूदान चळवळी मध्ये सुद्धा अनेक स्त्रीयांनी महत्त्वाचं कार्य केले आहे. तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्ती लढ्यात महिलांनी सहभाग जास्तीत जास्त घेतला होता. त्यामुळे तर वेठबिगारीतून स्त्रियांची मुक्तता करण्यात आली. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी मुंबईत लाटणे मोर्चा काढून ऐन दिवाळीत तेल,तूप,साखर,रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी सामूहिक नारीशक्तीचा आविष्कार दाखविला.चिपको आंदोलनामध्ये महिलांनी झाडांना मिठी मारून वृक्षतोड करू नये. असे ठामपणे सांगितले. त्यामुळे महिलांची शक्ती सर्वत्र वाढत आहे.आंध्रप्रदेशात 1992 मध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. दारूमुळे दुःख, दारिद्र्य यांचा सामना करावा लागतो. हे महिलांना कळाले. त्यामुळे त्यांनी गावोगावी जाऊन दारूचे दुकाने बंद केले.या सर्व गोष्टीचा अभ्यास करून संयुक्त राष्ट्र संघटनेने 1975 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून घोषित केले.शांतता,विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती.
1975 मध्ये डॉ. फुल रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे स्त्रियांचे शिक्षण व त्यांची टक्केवारी शिक्षणामुळे झालेला विकास नोकरी करणाऱ्या महिलांच्या अडचणी या विषयी कार्यक्रम राबवण्यात आले.
1978 मध्ये स्त्रियांच्या जाहीर नामा प्रसिद्ध झाला.
लिंगभेद,जातीभेद,वर्णभेद या असमान घटकाच्या विरोधात संघर्ष करण्याचे धोरण ठरले.ज्योती महापस्केकर यांचे मुलगी झाली’
हे पथनाट्य फार गाजले. विद्या बाल यांची ‘नारी समता मंच’ आणि ‘मिळून साऱ्याजणी’ ही नियत कालिके समाजवादी महिला सभा क्रांतीकारी महिला संघटना यांचीही कार्य स्त्री प्रश्नाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरले. प्रमिला दंडवते यांनी दिल्लीत 1976 मध्ये महिला दक्षता समितीची स्थापना केली.स्त्रियांच्या बाबतीत अनेक कायदे करण्यात आले. हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले. वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्यात आला. हुंडा प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्यात आली. स्त्रियांच्या संदर्भातील कायदे कडक चालविले पाहिजे. कसल्याही पद्धतीने पीडित महिलावर अन्याय होऊ नये.
हुंडा प्रथेच्या विरोधात जनजागृती केली पाहिजे.प्रत्यक्ष हुंड्याच्या छळा साठी महिला मरतात. परंतु त्याचे कारण इतर दाखवले जातात. असे होता कामा नये. महिलांच्या विवाह संदर्भातील वाद संसारिक समस्या व त्यातून निर्माण होणारे प्रश्न, पोटगी, एकल पालकत्व विभाग तसेच अपत्याचे संगोपन या सर्व गोष्टीवर कौटुंबिक न्यायालयात दाद मागता येते.
साक्षी पुरावे तपासण्यापेक्षा सामंजस्य आणि वकिला ऐवजी समुपदेशकांना प्राधान्य देण्यात यावे. त्यामुळे आजची स्त्री ही सक्षमीकरणाकडे खरोखरच वाटचाल करीत आहे. भारत सरकारने मानवाधिकार संरक्षण कायदा स्थापन केला आहे.
स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1913 मध्ये हा कायदा संमत करण्यात आला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. 73 आणि 74 व्या संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद,नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखून ठेवलेल्या आहेत. सरपंच, नगराध्यक्ष, महापौर पदासाठी महिलांसाठी जागा राखीव आहेत. देशातील महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यात महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.या सर्व तरतुदीमुळे महिला राजकारणामध्ये जास्तीत जास्त सहभागी होत आहेत. मतदाना सारखा महत्त्वाचा राजकीय हक्क महिलांना मिळाला. पुरुषाच्या बरोबरीने महिलांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बहुपत्नीत्व, हुंडाबळी यासारख्या दुष्ट,प्रथावर कायद्याने बंदी घातली आहे. राजकीय सत्तेत स्त्रियांना न्याय वाटा देण्याच्या हेतूने स्थानिक शासन संस्थांमध्ये काही जागा राखीव ठेवले आहेत. त्यामुळेच महिला आज शिक्षण घेऊन अर्थार्जन करून राजकारणा मध्ये सुद्धा सहभागी होत आहेत. स्त्री मुक्तीच्या विचाराने स्त्रियांना आत्मभान येत आहे. शिक्षण, अर्थार्जन, प्रशासन, राजकारण, समाजकारण, अध्यात्म या सर्व क्षेत्रात महिला हिरीरीने भाग घेऊ लागल्या आहेत. भारतातल्या अनेक महिला मुख्यमंत्री झालेले आहेत. न्यूयॉर्क शहरात आठ मार्च 1857 रोजी एक मोर्चा निघाला होता .त्यात कामाचे तास कमी करावे. अशी मागणी होती. त्यामुळे 8 मार्च 1990 रोजी महिलांनी संप केला. त्यामुळेच 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजर केले गेले. 1977 मध्ये संयुक्त राष्ट्राचे आमसभेने ठराव मंजूर करून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना हक्कांच्या जागा निर्माण करून दिलेल्या आहेत.भटक्या व विमुक्त जाती जमातीच्या महिलांना सुद्धा वेगवेगळ्या पदावर कार्य करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे.
संविधानाने सर्वांनाच समान हक्क दिले आहेत. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सुद्धा बहाल केले आहेत.अल्पसंख्याक असलेल्या घटकांना आपापली भाषा, संस्कृती, परंपरा यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क संविधानाने दिला आहे.
म्हणून आजच्या महिला ही सक्षमीकरणाकडे वाटचाल करीत आहेत.ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष समानता हा ग्रंथ लिहिला. रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांनी आपलं कार्य विस्तारित केले. सुनीता विल्यम्स, किरण बेदी, कर्णाम मलेश्वरी या महिलांनी आपपल्या क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा महिलांनी पुढचे पाऊल टाकले आहे. शांता शेळके, डॉ.तारा भवाळकर यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी भूषविले आहेत. आमदार, खासदार म्हणून सध्याच्या मंत्रिमंडळात अनेक महिला आपलं कार्य चोखपणे बजावत आहेत. जिकडे तिकडे शिक्षणामुळे सुधारणा झालेल्या आहेत. शिक्षण हे सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे. यामुळेच या सर्व महिला सुशिक्षित आणि शिक्षित झालेल्या आहेत.हे सांगण्यास मला अभिमान वाटतो. महिलांनी कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगू नये. उपवास करून देव मिळत नसतो म्हणून सर्व महिलांनी आधुनिकतेची स्वप्न उराशी बाळगावीत.सत्य वचनी राहावेत. मालिका,चित्रपट, नाटक यामध्ये काम करून सुद्धा अनेक महिला आपलं अर्थार्जन करू लागल्या आहेत. जवळजवळ भूदल,वायुदल, नौदल या क्षेत्रात ही महिला पाठीमागे राहिलेल्या नाहीत. महिलांच्या चांगल्या कार्यामुळेच अनेक शैक्षणिक संस्थेला त्यांची नावे दिल्या जात आहेत. श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ, पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण केले आहे. त्यामुळेच तर सावित्रीबाई फुले या महिलांच्या प्रेरणास्त्रोत आहेत. असे मला येथे आवर्जून सांगावे वाटते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन..
प्रा. विठ्ठल लक्ष्मीबाई गणपतराव बरसमवाड अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी
ता मुखेड जि.नांदेड

