कंधार प्रतिनिधी (- माधव गोटमवाड)
तालुक्यातील स्वप्नभूमीनगर कंधार येथील गयाबाई विठ्ठल माडगे यांचे दि. 27 डिसेंबर रोजी विद्युत वितरण कंपनी (महापारेषण) कंधार उपविभागातील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका महिलेचा 33 kv फुलवळला जाणाऱ्या मेन लाईट चा तार 5 फुटावर लोमकळत होता त्या तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच दि ४ जानेवारी रोजी कंधार तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी स्वप्नभूमीनगर कंधार येथे माडगे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. सोबतच माडगे यांची दोन मुलाचे पालकत्व स्वीकार करून त्यांना आर्थिक मदत केली.मृत गयाबाई माडगे यांच्या परिवारात त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पती असा परिवार आहे. घरातील करत्याधरत्या स्त्रीच्या निधनाने माडगे परिवारावर एक मोठे संकट कोसळले असून या संकटातुन सावरण्यासाठी त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली.या संकटकाळात मी तुमच्या पाठीशी आहे अशा शब्दात त्यांना धीर,आधार देण्याचे कार्य काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय भोसीकर यांनी केले.
कंधार तालुक्यातील कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी कुटुंबाची विचारपूस किंवा सांत्वन भेट घेतली नाही.
तालुक्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, बालाजी येईलवाड, देविदास गोटमवाड,काशिनाथ घुमे,विठ्ठल माडगे,पत्रकार माधव गोटमवाड, नारायण गोटमवाड व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

