बारुळ : प्रतिनिधी
बारूळचे भूमिपुत्र प्रा.कासिम जाफरसाब शेख यांनी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात दिलेली प्रदीर्घ सेवेनंतर सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रथमच बारुळ येथे आल्यानंतर बबलू शेख बारुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत छोटेखाणी कार्यक्रमात शाहरुख पठाण मित्र मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करून पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सेवेनिवृत्तीनंतरचे जीवन आरोग्यदायी,आनंदी व समाधानकारक जावे अशी ह.ख्वाजा गरीब नवाज चरणी प्रार्थना केली.प्रा.कासिम शेख यांनी अनेक वर्षाच्या समर्पित सेवेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचं,प्रेरणा देण्याच कार्य करत असतात,सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुमचं मार्गदर्शन धर्माबाद सह आमच्या बारूळ येथील विद्यार्थ्यांसाठी असेल यात काही शंका नाही, तुमची कार्य खरोखरच कौतुकास्पद होते अशा भावना बबलू शेख बारुळकर यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी पठाण नजीर,शेख इस्माईल,शेख सुलतान,पठाण इब्राहिम,पठाण मुखीद,शेख युनूस,शेख जावेद,शेख इरफान,शेख जब्बार,समीर पठाण,पठाण अमीन,शेख आमिर,सय्यद अकबर यांच्यासह शाहरुख पठाण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

