बळीरामपुर चे ग्रामसेवक गोविंद माचनवाड यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले
नांदेड ; नागोराव कुडके
नांदेड तालुक्यातील बळीरामपुर ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक गोविंद गुणाजी माचनवाड वय ४० वर्ष रा. सुनिल नगर बळीरामपुर येथिल असुन दि १o ऑगस्ट रोजी त्यांना ८ हजार रूपयाची लाच स्विकारल्यावर त्यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले .
असुन तक्रारदार यांनी दि ६ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती की यातील लोकसेवक गोविंद माचनवाड यांनी तक्रारदार यांना पाणी प्लांट टाकण्यासाठी त्यांना बळीरामपुर ग्रामपंचायत कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १० हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती असे तक्रारदार यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंध विभाग नांदेड कार्यालया कडुन दि ७ ऑगस्ट रोजी पंचा समक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवक गोविंद माचनवाड यांनी तक्रारदार यांच्या कडे वरिल कारणासाठी १० हजार लाचेची मागणी करूण तडजोडी अंती ८ हजार रू लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असुन त्या आधारे दि १० ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने एस बी आय बॅंक संभाजी चौक सिडको नांदेड येथे सापळा रचुन या सापळ्यामध्ये लोकसेवक गोविंद माचनवाड यांनी तक्रारदार यांच्या कडून ८ हजार रू लाचेची रक्कम स्विकारल्या नंतर त्यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपी लोकसेवक माचनवाड वय ४० वर्ष रा सुनिल नगर बळीरामपुर ग्रामसेवक बळीराम कार्यालय ता जि नांदेड येथिल असुन त्याच्यावर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन सदरील गुन्हयाचा तपास शेषराव नितनवरे लाचलुचपत प्रतिबंध विभाग नांदेड हे करीत असुन सदरील सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवनकर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील , पोलीस उपअधिक्षक संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे, पोना हनमंत बोरकर , किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, नरेंद्र बोडके, अनिल कदम आदींचा या कार्यवाहीत सहभाग होता.