नांदेड_दि. 13
13 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 71 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 82 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 63 बाधित आले.आजच्या एकुण 629 अहवालापैकी 520 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 3 हजार 699 एवढी झाली असून यातील 2 हजार 127 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 419 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 142 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
12 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे नाईक नगर, नांदेड येथील 78 वर्षाचा एक पुरुष, बळीरामपुर नांदेड येथील 30 वर्षाची एक महिला, धनेगाव नांदेड येथील 49 वर्षाची एक महिला, 13 ऑगस्ट रोजी नायगाव येथील 65 वर्षाचा एक पुरुष, दिलीपसिंघ कॉलनी, नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय, नांदेड येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 134 एवढी झाली आहे.
✔️आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 4, ☑️लोहा तालुक्यात 2, ☑️बिलोली 1, ☑️देगलूर 2, ☑️नांदेड ग्रामीण 2, ☑️मुखेड 3, ☑️भोकर 1, ☑️धर्माबाद 4 असे एकुण 19 बाधित आढळले. #Playmarathinews ✔️तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 16, ☑️भोकर 1, ☑️मुदखेड 3, ☑️कंधार 6, ☑️मुखेड 18, ☑️धर्माबाद 1, ☑️परभणी 1, ☑️अर्धापूर 2, ☑️बिलोली 4, ☑️उमरी 3, ☑️किनवट 3, ☑️नायगाव 1,☑️ देगलूर 4 असे एकूण 63 बाधित आढळले.
जिल्ह्यात 1 हजार 419 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे186, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 515, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 43, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 31, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 120, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 101, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, हदगाव कोविड केअर सेंटर 34, भोकर कोविड केअर सेंटर 18, कंधार कोविड केअर सेंटर येथे 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 35, किनवट कोविड केअर सेंटर येथे 36, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 34, मुदखेड कोविड केअर सेटर 24, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, माहूर कोविड केअर सेंटर येथे 5, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 29, बारड कोविड केअर सेंटर 4, उमरी कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 125 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.
✔️जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती ☑️सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 145,☑️घेतलेले स्वॅब- 25 हजार 482,☑️निगेटिव्ह स्वॅब- 19 हजार 533,☑️आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 82,☑️एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 699,☑️आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,☑️आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1,☑️एकूण मृत्यू संख्या- 134,☑️एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 127,☑️रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 419,☑️आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 719, ☑️आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 142.
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.