धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी कंधार तहसीलदारांना रक्तलिखीत निवेदन


कंधार ; मिर्झा जमिर बेग

धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य संयोजक डॉ.शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली दि.13 ऑगस्ट2020 रोजी पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या पुण्यासमरण दिनाचे औचित्य साधून “धनगर  समाजाच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय कंधार  यांना भास्कर तळणे ,श्रीहरी मुंडकर या  समाज बांधवांसोबत बहुजन समाजातील विनोद भाऊ पापीनवार नगरसेवक, नगरपरिषद कंधार यांच्या स्वत:च्या रक्ताने  रक्तलिखीत निवेदन देण्यात आले
तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमुन केले आहे की १)धनगर समाज ST आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी.मागील सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेले एक हजार कोटी रुपयांची लवकरात लवकर तरतूद करावी.3) मेंढपाळ बांधवाववर होणारे हल्ले थांबवून त्यांना न्याय व संरक्षण द्या.

 इत्यादी मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा धनगर समाज हिशेब घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही आणि या मागणीसाठी अनेक वर्षांपासून धनगर समाज निवेदने देऊन, मोर्चे   आंदोलने करून मागण्या करत आहेत , ह्या मागण्या सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत आहेत. येणाऱ्या काळात जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यात खूप मोठा उद्रेक होईल व ह्याला सर्वस्वी जबाबदार शासन व राज्यकर्ते असतील असे निवेदनात प्रतिपादन करण्यात आले आहे.
यावेळी धनगर बांधवासोबत बहुजन वर्गातील बांधव देखील उपस्थित होते यात नगरसेवक  विनोद पापीनवार,मामा गायकवाड,सतिश देवकत्ते,भास्कर तळणे धानोरकर,श्रीहरी मुंडकर बारुळकर, व्यंकट शेवाळे,सुरेश वाघमारे,ओम वाखरडे,श्याम वाखरडे आदी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *