कंधार ; प्रतिनिधी
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थांना मराठी वाचन लेखन आणि गणिताच्या संख्याज्ञान,संख्यावरील क्रिया आदिसह मुलभुत संकल्पना दृष्ठ व्हावे म्हणून गुढीपाडव्याच्या औचित्याने कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत दि २९ मार्च रोजी शनिवारी शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी मुळाक्षरे,बाराखडी,उजळणी, आदीची अक्षरगुढी उभारली आणि नंतर गुढीचे चित्र देऊन रंगभरण स्पर्धा घेण्यात आली .
गुढीपाडवा हा हिंदू धर्मीयांचा सण अजून या दिवशी गुढी उभारली जाते सध्या शासनाच्या वतीने निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी पासून पाचवी पर्यंत अध्ययन क्षमता विकसीत व्हाव्यात म्हणून उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी एन केंद्रे सचिव चेतनभाऊ केंद्रे ,माजी नगराध्यक्षा तथा संस्था संचालीका अनुसया चेतन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत सदर उपक्रम राबविण्यात आला .
शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे , शिक्षिका उषा कागणे,आनंद आगलावे , बालकताई चंद्रकला तेलंग,माणिक बोरकर
यांनी नियोजन करून अक्षरगुढी उभारण्यात आली नंतर रंगभरण स्पर्धा घेण्यात आली .विद्यार्थांनी वेषभुषा साकारली होती .