धर्मापुरी ( प्रतिनिधी )
येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 22 मार्च 25 रोजी सकाळी ठीक 11 00 वाजता प्रा भगवान कि आमलापुरे लिखित महाविद्यालय गीताच्या भिंती पत्रकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. या भिंती पत्रकाचे प्रकाशन जय भगवान सेवाभावी संस्था धर्मापुरीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ शिवाजीराव गुट्टे ( अण्णा ) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदरील गीत आणि या कार्यक्रमास प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी दि 12 मार्च 25 रोजी तत्वतः मंजुरी दिली होती. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ मामडगे पी डी, सुत्रसंचलन प्रा डॉ रमाकांत गजलवार करणार आहेत. आभार प्रा डॉ चाळक ए डी या मानणार आहेत.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.