मुखेड: (दादाराव आगलावे)
उन्हाची चाहूल लागताच सेवाभावी वृत्तीने काम करण्यात अग्रेसर असलेल्या जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने, प्रति वर्षाप्रमाणे माळरानावर पशु व पक्षांना नुकतीच पाण्याची सोय करण्यात आली असून नियमित पाणी टाकण्याचा वसा सदरील ग्रुपने घेतला आहे.
प्रत्येक वर्षी जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यात रक्तदान शिबिर, गौरव सावित्रीच्या लेकींचा, गोरगरीब गरजूंना चादरी वाटप, बस स्थानकात सिमेंट बेंचेस, वृक्षारोपण व जोपासना विविध कार्यक्रमात सेवाभावी वृत्तीचे कार्य करत असते यंदा उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मुखेड परिसरातील माळरानावर पक्ष्यांची व जंगली प्राण्यांची रहदारी असलेल्या ठिकाणी झाडाखाली व झाडावरती पाण्याची सोय केली असून नियमित तेथे पाणी टाकले जाते. सदरील कार्यात यावेळी दादाराव आगलावे, जय जोशी, बालाजी तलवारे, बलभीम शेंडगे, वैजनाथ दमकोंडवार, डॉ. रामराव श्रीरामे, नामदेव श्रीमंगले, जयप्रकाश चौहान, हनुमंत गुंडावार, सुरेश उत्तरवार, अरुण पत्तेवार, राजेश भागवतकर, उमाकांत डांगे, गोविंद पाटील, सुरेंद्र गादेकर, उत्तम अमृतवार, विठ्ठल बिडवई, आकाश पोतदार, विठ्ठल मोरे, सागर चौधरी, श्रीकांत घोगरे, गजानन मेहरकर, बालाजी वडजे, साईनाथ कोत्तापल्ले, माधव गुंडावार यां जिप्सी सदस्यसह बालाजीराव रेनगुंटवार, कन्हैया मिस्त्री मंडले, दीपक मंडले यांनी पुढाकार घेतला.
विविध संघटनांनी या कार्याचे वारकरी व्हावेत
-दादाराव आगलावे
प्रति वर्षापेक्षा यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात पक्षांना पाण्याची सोय करावी तरच पक्षांचे जगणे सोपे होईल. तरी सर्वांनी या उपक्रमाचे वारकरी व्हावेत असे आवाहन जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे यांनी केले आहे.