कंधार/ प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे शेकापूर व परिसरातिल संगमवाडी,तळ्याचीवाडी,सर्व तांडे येथिल सर्व जनतेस व शिवभक्तांस तसेच परिसरातील सर्व जनतेस भजनीमंडळी,गायक,वादक,मृदंगाचार्य,पहिलवान मंडळी व सर्व कुस्तीप्रेमी मंडळिस कळविण्यात आनंद होतो की मौजे शेकापूर ता.कंधार जि.नांदेड येथे दरवर्षी प्रमाने याही वर्षी आमली बार्शीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह,श्री शंभो महादेवाची भव्य यात्रा व कुस्त्यांची भव्य दंगल आयोजीत केली आहे.
अखंड हरिनाम सप्ताहीची सुरूवात दि.5 एप्रिल 2025 रोजी होत आहे व सप्ताहाची सांगता दि.12 एप्रिल 2025 रोजी आहे.दि.9 एप्रिल 2025 रोजी बुधवारी पहाटे 5:00 वाजता श्री शंभो महादेवाचा महाअभिषेक होईल व रात्री 7:00 वाजता कावड्याचा कार्यक्रम होईल.दि.10 एप्रिल 2025 रोजी गुरूवारी सकाळी ठिक 10:00 वाजता श्री शंभो महादेव मंदिराजवळ कुस्त्यांची प्रचंड दंगल होईल,शेवटची कुस्ती 7051 रुपयांची होईल.कुस्त्यानंतर दुपारी ठिक 2:00वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.तरी शेकापूर व परिसरातिल सर्व जनतेनी,माताभगीनिंनी या अखंड हरिनाम सप्ताहास व भव्य यात्रेस,कुस्त्यांच्या प्रचंड दंगलीस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व श्री शंभो महादेवाचा आशिर्वाद घ्यावा ही विनंती.
आपले विनित-यात्रा कमिटी शेकापूर,ग्रामपंचायत कार्यालय,सेवा सहकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळी मौ.शेकापूर व परिसरातिल तळ्याचीवाडी,संगमवाडी व सर्व तांडे ता.कंधार जि.नांदेड यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.