मुखेड: प्रतिनिधी
‘संचेती’ हॉस्पिटल पुणे येथे नावलौकिक मिळवलेले डॉ. शफी अहेमद हे एम.बी.बी.एस. नंतर एम. एस. (ऑर्थो) उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा मुखेड भूषण तथा डब्ल्यूएचओ चे सदस्य डॉ. दिलीपराव पुंडे यांनी ‘पुंडे हॉस्पिटल’च्या वतीने सत्कार केला.
डॉ.शफी अहेमद यांनी संचेती हॉस्पिटल पुणे पूर्वी दिल्ली येथील तिहार जेल येथे मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले. तसेच दिल्ली येथील नामवंत ESI हॉस्पिटल मध्ये वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. दिल्ली येथे AIIMS हॉस्पिटलमध्ये हे काम केले. गजियाबाद कोशिंबी येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले तर सध्या त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम येथे मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या कमी वयातील उंच भरारी बद्दल पुंडे हॉस्पिटलच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकार दादाराव आगलावे, बालाजी डोनगावे, व्यकंट शिंदे, भास्कर इंगोले, शंकर चव्हाण, राम जाधव, गजानन बंडे, दिनेश देव्हारे, आरिफ शेख यांची उपस्थिती होती. डॉ. शफी अहेमद हे सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंतनगर ता. मुखेड येथील सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक खा.खा. शेख यांचे चिरंजीव आहेत. डॉ. शफी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.