आ. श्रीजया चव्हाण यांच्या मध्यस्थीने पाथरडच्या ग्रामस्थांचे उपोषण मागे*

 

नांदेड, दि. ३ एप्रिल २०२५:

मुदखेड तालुक्यातील पाथरड येथील रेल्वे पुलाच्या कामासाठी गावकऱ्यांनी सुरु केलेले उपोषण भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मध्यस्थीने आज मागे घेण्यात आले.

पाथरड येथे रेल्वे पूल मंजूर असून, ते काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे सरपंच कैलास गंगाधरराव पाटील, उपसरपंच जयवंत रामजी थोरात यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या अनुषंगाने आ. श्रीजया चव्हाण यांनी आज उपोषण मंडपात जाऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आ. आनंदराव तिडके. भाजप नेते व जिल्हा बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाजपचे प्रवक्ते निलेश देशमुख बारडकर, लक्ष्मणराव जाधव आदी नेतेही उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेनंतर आ. श्रीजया चव्हाण यांनी सरपंच, उपसरपंच व गावकऱ्यांच्या शिष्टमंडळासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेत वडदकर यांनी येत्या ७ एप्रिल रोजी रेल्वे अधिकारी, कंत्राटदार व इतर संबंधितांसह बैठक आयोजित करून पुढील कार्यवाही केली जाईल असे सांगितले. त्यानंतर आ. श्रीजया चव्हाण यांनी गावकऱ्यांना तूर्तास उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पाथरड येथील रेल्वेचे पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि गावकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी मी देखील पाठपुरावा करत राहील, असा शब्द दिला. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आमदारांच्या हस्ते फळांचा रस घेऊन आपले आंदोलन मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *