नांदेड: प्रतिनिधी
वृंदावन कॉलनी नांदेड येथील रहिवासी आनंद दत्तात्रयराव जाधव यांच्या सासुबाई श्रीमती शांताबाई राजाराम सूर्यवंशी यांचे वर्धापकालाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 85 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव टाकळी (कुंभकर्ण) जिल्हा परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातू, पनतू असा मोठा परिवार आहे. टाकळी येथील अंगणवाडी शिक्षिका श्रीमती कालिंदा लोंढे व सौ. आश्विनी जाधव यांच्या मातोश्री तर अभियंता सुमित आखाडे, अभियंता जयश्री आखाडे, परभणी शहर महानगरपालिका येथील बांधकाम अभियंता संतोष लोंढे, भाजपा परभणी शहर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, सौ. शीतल देशमुख, अभियंता शुभम जाधव यांच्या आजी होत. त्यांच्या श्रीमती शांताबाई सूर्यवंशी यांच्या निधनाने टाकळी कुंभकर्ण येथे शोककळा पसरली आहे.