नांदेड – गंगाधर ढवळे
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शामसुंदर शिंदे यांनी मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन लोहा कंधार मतदार संघातील विविध शैक्षणिक अडीअडचणींवर प्रदीर्घ चर्चा केली.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांना सांगितले की लोहा कंधार मतदार संघातील शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळात शैक्षणिक अडीअडचणी संदर्भात आपल्या मतदार संघातील कोणत्याही शैक्षणिक प्रश्नाविषयी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ही यावेळी ना. गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिंदे यांना सांगितले