लोहा ; विनोद महाबळे
लोहा तालुक्याचे भुमीपुत्र सुनील पाटील शिंदे हे भारतीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परिक्षेत अव्वल गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल, सिद्धार्थ नगर मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. सुनील पाटील शिंदे यांच्या यशामुळे लोहा तालुक्याची नाव संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात उंचावल्या बद्दल आपण लोहावासीय म्हणून पुष्पहार, शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.,तसेच सुनील पाटील शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण लोहा येथे पूर्ण झालेले असून त्यांचे वडील श्री.आर.एन.शिंदे सर यांनी श्री.संत गाडगे महाराज ज्युनिअर काँलेज लोहा येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून उत्तम सेवा बजावली होती.सुनील पाटील शिंदे यांचे यश लोहा तालुक्यातील युवकांना एक प्रेरणास्रोत म्हणून उदयास आले असून, महाविद्यालयीन तरूणांनीही आपला कल स्पर्धा परिक्षेकडून वळूवून उत्तुंग यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ लोह्याचे तालुका अध्यक्ष मंगल सोनकांबळे यांनी केले. सत्कार प्रसंगी अखिल म.प्रा.शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मुर्तुज शेख सर,शिवा व्यापारी आघाडी ता.अध्यक्ष गणेशराव घोडके,सिद्धार्थ नगर मित्र मंडळ लोह्याचे बबन दादा कांबळे,रवि वाघमारे,जब्बार कुरेशी, केशव वाघमारे,अमोल दाढेल, भिमा थोरात ,बंडा कापुरे, माधव दाढेल,अक्षय कानोडे,संदिप कानोडे, केदार खेडकर,बालाजी कटकमोड,लखन खंडागळे, जमीन कुरेशी, शाम दाढेल, गजानन दाढेल, हबीब कुरेशी,रोनक कापुरे, अभय कोकरे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.