नांदेड ; प्रतिनिधी
मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राज्याचे प्रदेशाध्यक्ष म चंद्रकांत दादा पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे, प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिह, संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, जिल्ह्याचे
खासदार. प्रतापराव पाटील चिखलीकर , अरविंद भैया निलंगेकर, महिला मोर्चा सरचिटणीस दिपाली मोकाशी, महिला मोर्चा सचिव ऍड वर्षाताई डहाळे आदी मान्यवरांच्या समवेत वर्षपूर्ती कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
वर्षे पूर्ती कार्य अहवाल प्रकाशित झाल्या नंतर प्राणिताताई देवरे चिखलीकर म्हणाल्या की भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून आज एक वर्ष झाले.तसा हा कोरोनाचा काळ ..पण त्यावर मात करीत पक्षाने वेळोवेळी दिलेल्या जबाबदारी पार पडण्याचा मी प्रयत्न केला.मला प्रदेश पातळीवर पक्ष कार्य करण्याची संधी मिळाली आदरनिय देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमताई खापरे व पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या नेतृत्वाखाली वर्ष भरात पक्षाने जी जबाबदारी दिली त्याचे विश्वासाने पार पाडण्याचा प्रयत्न केला कोरोना काळात गरजवंतांना वैद्यकिय मदत असो की पक्षाने दिलेला कार्यक्रम यात सक्रिय सहभाग घेतला.राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन तसेच महिला अत्याचार विरोधात पक्षाने आदेश दिले आणि आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलने केली.
देशाचे पंतप्रधान मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट या काळात झाली त्यांच्याशी संवाद साधता आला हा क्षण अविस्मरणीय होता पंतप्रधान मोदीजी व केंद्रातील भाजप सरकार यांनी राबविलेल्या योजनांची माहिती लोकांना समजावून सांगितली.राज्य पातळीवर पक्षाने मला जी जबाबदारी दिली ती पार पडण्याचा प्रयत्न केला. माझ्या कामाची।पक्ष नेतृत्वाने नोंद घेतली वेळेवेळी .शाबासकी ची थाप दिली.मला खुप काही शिकता आले.पक्ष शिस्त ..ध्येय धोरण..इथं पासून ते संघटन मजबुती हे जवळून पाहता आले आणि तसे कार्य करता आले.
यासाठी माझे वडील जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील यांची प्रेरणा मिळाली नांदेडच्या सर्वांचे मोठे सहकार्य मिळाले
( पप्पा) यांच्या संघटन व काम करण्याच्या शैलीचा माझ्यावर प्रभाव आहे त्यामुळे मलाही वेगवेगळ्या जिल्ह्यात महिलांचे संघटन उभे करताना त्याचा खूप फायदा झाला.राजकीय जीवनात पक्ष संघटनेत एक वर्ष हा कालावधी फार नाही पण मला जे शिकायला आणि काम करायला मिळाले त्यातून नवी ऊर्जा माझ्या साठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे. यापुढेही पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी आवर्जून सांगितले.