कंधार:-
राज्यात सगळ्या गोष्टीं पूर्णपणे चालू असून पक्षीय कार्यक्रम, उदघाटन,व्यापार शेकडो लोकांच्या गर्दीत होत असून फक्त शाळा बंद करणे हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाय होवू शकत नाही,अशा जनतेच्या भावना असून विद्यार्थ्यांचे बरबाद होणारे शैक्षणिक आयुष्य वाचवण्यासाठी राज्यातील सर्व शाळा पूर्णपणे चालू करावी ही जनभावना आहे या जनभावनेचा आदर करून तात्काळ निर्णय घ्यावा. अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार कंधार व गटशिक्षणाधिकारी कंधार यांना करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,
शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,उपाध्यक्ष सुभाष मुंडे,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, युवा मोर्चा चे जिल्ह्याचे उपाध्यक्ष निलेश गौर,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, भाजपा शिक्षक आघाडी जिल्हा सहसंयोजक गिरीश नागरगोजे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे, चेतन केंद्रे ,कैलास नवघरे ,श्रीराम जाधव ,शंकरराव जाधव, बालाजी तोरणे, राष्ट्रीय परिषद सदस्य तुकाराम वारकड, सतीश कांबळे, माधव वाकोरे, उमेश शिंदे ,दत्ता डांगे, दीपक गोरे,अड सागर डोंगरजकर, कांतराम आगलावे ,माणिकराव बोरकर, दत्तात्रय किंनवाड, धोंडीराम गडमवाड,मधुकर कांबळे,परमेश्वर कटकेमोड, प्रदीप मंगनाळे,गजानन कल्याणकर,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.