पांगरा-कंधार घोडज फाटा महामार्ग जोडरस्ता मंजूरीचे श्रेय कोणी घेऊ नये- हरीहराव भोसीकर

कंधार येथे पञकार परिषदेत माहीती

कंधार ;

पालकमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांना विनंती करून व पाठपुरावा करून मी तिन्ही महामार्ग रस्ते मंजूर करून घेतले असतांना काही लोकप्रतिनिधी या मंजुर रस्त्याची मागणी मी मंजूर करून घेतलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असुन तशा प्रकारच्या खोट्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिध्द करीत आहेत त्या चुकीच्या आहेत. असा खुलासा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हरीहर राव भोसीकर यांनी कंधार येथे दि.२० जानेवारी रोजी आयोजीत पञकार परिषदेत केला

ते पुढे म्हणाले की
कंधार पांगरा रस्त्याचे मजबुतीकरण करून सिमेंट रोड व डांबरीकरण करणे बाबत मी राज्याचे माजी मुख्यमंत्री च सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना पत्र देऊन दिनांक 08/07/2021 रोजी मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून सदरील रस्ता कंघार ते पांगरा 7 की.मी. लांबीचा रस्ता कंधार शहरातील महाराणाप्रतापसिंह चौकातून पाग-या हायवेस जोडल्यास कंपार शहराचे महत्त्व लक्षात घेता येथील हाजी सैय्याह यांची दर्गाह, कंधारकर साधु महाराज यांची समाधी स्थळ तसेच जुना ●भोईकोट किल्ला असुन कंधार शहर हे पर्यटन स्थळ आहे.

त्यामुळे कंधार है शहर पांगरा हायवेस जोडल्यास कंधार शहरातील महाराणा प्रमापसिंह चौक ते पांगरा हे दोन पदरी सिमेंट रोड तसेच पुढे दोन पदरी डांबरीकरण केल्यास कंधार शहराचे महत्व लक्षात घेउन असे मी मा.अशोकरावजी चव्हाण यांना सांगितले असता त्यांनी सदर रस्ता एस. आर मध्ये घेण्याचे डेपुटी सेकटरी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आदेशीत केले.

तसेच पानभोसी खांडी ते अंबेसांगवी हा रस्ता रुंदीकरण करून दोनपदरी डांबरीकरण करून आंबेसांगवी गावाजवळ नागपुर, बोरी, तुळजापुर या हायवेस जोडल्यास कंधार व आजुबाजुच्या लोकांना या रस्त्याने नांदेड कडे जावयाचे झाल्यास किमान 12 की.मी. अंतर कमी होतो. त्यामुळे लोकांच्या इंधनाचा खर्च वाचु शकतो. अशी मी पत्राद्वारे मा. अशोकरावजी चव्हाण सार्वजनिक मंत्री तथा पालकमंत्री यांना विनंती केली. त्यानुसार मा. अशोकरावजी चव्हाण सदर रस्ता एस. आर योजनेअंतर्गत मंजुर करणे बाबत आदेश दिले.

वरील दोन्ही रस्ते व ●पानभोसी गावातुन पागरा या हायवेकडे जाणारा रस्ता 4 की.मी. पैकी पानभोसी गावातून जाणारा सिमेंट रोड उर्वरीत रोड डांबरीकरण करून पानभोसी व उर्वरीत गांवाना जाण्यासाठी पांगरा हायवेस जोडल्यास उदगिर कडे व इतर गावाकडे जाण्यासाठी अंतर कमी होते असे निर्देशनास आणुन दिले असता त्यांनी वरील तिनंही रस्त्याना मंजुरी देउन आर्थिक तरतुद करण्याबाबत आदेशीत केले.

त्याप्रमाणे दि.15 सप्टेंबर 2021 रोजी मन्त्रालयातुन मुख्य अभियंता याना आपला पत्राचा संदर्भ देउन सदरील तीन्ही रस्त्याचे अंदाजपत्रक पाठवण्याबाबत आदेश केले.

त्यानंतर मुख्य अभियंता यांनी सर्व्हे करून दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजीच्या पत्राने अविनाश धोंडगे अधिक्षक अभियंता यांनी मुख्य अभियंता सा.बा. औरंगाबाद यांना रितसर रस्त्याची पाहणी करून सदर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर दिलीप उकीरडे मुख्य अभियंता यांनी उपसचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई दि. 08/11/2021 च्या पत्रान्वये शासनाच्या मान्यतेसाठी सदरील प्रस्ताव यांच्याकडे पाठवला त्यानुसार मा. मंत्री सा.वा. यांनी सदरील रस्त्याचे मंजुरी देउन 13 कोटी 94 लाख रूपयांचा निधी प्राप्त करून दिला.

सदर तिन्ही रस्त्यास मंजुरी मिळाली असून महाराणाप्रताप चौक ते पुढे 2 की.मी. रस्ता सिमेंट चा होणार असून लगेचच काम सुरू होणार आहे.

त्यापुढील रस्ता डांबरीकरण चा होणार असून पुढच्या वर्षापर्यंत पुर्ण होउन हायवेस जोडला जाऊन कंधार शहर रूदीकरण्याच्या रस्त्यासह हायवेवर येणार आहे.

तसेच पानभोसी खांडीपासुन आंबेसागवी कडे चौपदरी डांबरीकर रस्ता होउन नागपुर, बोरी, तुळजापुर या हावेयस आबेसांगवी गावाजवळ येत्या दोन वर्षात टप्याटप्याने जोडल्या जाणर आहे.

तसेच पानभोसी ते पांगरा या पानभोसी गावातून जाणारा रस्ताचे एक की.मी. रस्ता सिमेंट रोड होणार असुन उर्वरित रस्ता डांबरीकरण ने जोडल्या जाणार आहे. सदर रस्ता पांगरा हायवेस जोडल्यामुळे व पानभोसी व परिसरातील गांवाना नांदेड व उदगिर कडे जाण्यासाठी अंतर कमी होणार आहे.
व पानभोसी गाव हायवेस जोडल्या जाणार आहे.

वरील तीनही रस्ते मी पालकमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांना विनंती करून व पाठपुरावा करून मंजूर करून घेतले असतांना काही लोक प्रतिनिधी या मंजुर रस्त्याची मागणी मी मंजूर करून घेतलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असुन तशा प्रकारच्या खोट्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिध्द करीत आहेत त्या चुकीच्या आहेत.

सदरची माहीती सर्वजनतेस व्हावी या उद्देशाने सदरची माहिती आपणांस देत आहे. अशी माहीती यावेळी पत्रकार परिषदेत हरीहरराव भोसीकर यांनी दिली .

यावेळी
दिंगाबर पेटकर जिल्हा उपाध्यक्ष, शिवदास धर्मापूरीकर तालुका अध्यक्ष , अँड अंगद केंद्रे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार , शिवकुमार भोसीकर उपसरपंच , मुकूंद चिवडे , बाबाराव थोटे , महंमद तन्वीरोदिन , दिंगाबर सोनवळे , नारायण पाटील , शहराध्यक्ष गायकवाड आदीसह कार्यक्रते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *