भारत मातेचे रक्षण करत करत आपल्या प्राणाची आहुती देली . त्या शहीदाचे नाव दिल्यास काय काेनाचा आपमान आहे का ?भारत मातेचे रक्षण करते वेळी कुटलीच परिवाराची परवा न करता भारत मातेसाठी आपले बलिदान दिले .
आशा विर शहीद जवानाचे नाव दिल्यास लाेहा नगरपालीकेचे नुकसान किंवा आपमान हाेईल का ?लाेहा कंधार वासीयांनाे शहीद झालेले जवान आनि रक्षण करत आसलेले जवान हे कुटुन बाहेर देशातुन येत नसतात तर तुम्हीच आम्हाला तयार करुन भारत मातेसाठी पाटवता.
मग आम्ही सर्वच देशासाठी शहीद हाेत नसताे.तर काही नशीबवाले आपले कर्तव्ये बजावत आसतांना शहीद हाेतात.मग त्या शहीदाच्या मानसन्मानाची देखभाल काेन करनार ? मिञ हाे भले ही आम्ही सेवा फुकट करत नाही पगार घेताे पन आम्ही ईमानदारी वफादारी आनुशासन मधे आपली सेवा बजावत आसताे.
जसे ईकडे लाेक कुटल्याही कार्यात आपले नाते गाेते जाेपासतात,आपल्या नात्यागाेत्याचा प्रत्येक माेडवर विचार करतात पन फाैजी आपली देश सेवा बजावत आसताना जर नाते गाेते सण वार कुटले प्राेग्राम याचा विचार केला तर जे आपन शांत झाेपताेना ते कधीच झाेपु शकत नाही.
म्हनुन मिञ हाे आम्ही देश सेवा केलाे म्हनुन आम्ही तुमच्या काहीच मागत नाही.पन जे जवान सेवा करत करत शहीद झाले त्या बदल आम्ही हाक्काने तुमच्या कडुन मागनार,त्यांच्या मानसन्माची आम्ही देखल भाल नक्कीच करनार
आनि जाे काेनी शहीदाच्या बलिदाना विषयी काेनी राजकारन करत आसतील किंवा त्यांच्या बलिदाना साेबत खेळन्याचा प्रत्यन करतील तर आम्ही सैनिक शांत नाही बसनार !
जय हिंद…
बालाजी चुकलवाड ,
जिल्हाध्यक्ष ,
माजि सैनिक संघटना ,
नांदेड