कंधार ; मोहमंद सिंकदर
राष्ट्रीय वारकरी परिषद कंधार च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. राज्यासह देशात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते.
या मुळे राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा हैराण झाले असून त्याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर ही देखील पडला आहे रक्तपेढीत गरजवंत रुग्णांना रक्त मिळेनासे झाले आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे व व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने राज्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करून राज्यात झालेला रक्त तुटवडा दूर करण्यासाठी प्रयत्न केले.जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा राष्ट्रीय वारकरी संप्रदाय सेवेसाठी तत्पर आहे.
हे सिध्द करण्यासाठी राष्ट्रीय वारकरी परिषद कंधार च्या वतीने दिनांक २३ ऑगस्ट रोजी बालाजी मंदिर कंधार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयजीत करून रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषद कंधारच्या करण्यात आले होते.
या वेळी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला कंधार लोहा तालुक्यातील सर्व राजकीय पुढाऱ्यांनी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुसते भेट देऊन या कार्याचे कौतुक केले.
रक्तदान शिबिरात प्रशासन व डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षितेच्या नियमाचे पालन करण्यात आले तसेच सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देण्यात आले.