कंधार ; मोहम्मद सिकंदर
आंतर जिल्हा बदली टप्पा ४ मध्ये अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा अशी मागणीचे निवेदन प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनला प्राप्त आदेश ११ ऑगस्ट २०२० संदर्भ देऊन लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रहार शिक्षक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन जोडराणे यांच्या स्वाक्षरीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दि.२१ ऑगस्ट रोजी लेखी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनला दि.११ ऑगस्ट २०२० च्या प्राप्त आदेशाचे संदर्भ देऊन असे नमूद केले आहे की, शासनस्तरावरून ऑनलाइन आंतरजिल्हा हा बदली टप्पा ४ चे ३१ शिक्षकांचे आदेश प्राप्त झाले आहेत.
सदर आदेशात संबंधित शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश असताना सुद्धा संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद मार्फत कार्यमुक्त करण्यात आलेली नाही. संबंधित बदली झालेले शिक्षक आज रोजी मानसिक तणावाखाली आहे त्यांना त्यांच्या बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याकरिता लवकरात लवकर कार्यमुक्त करणे बाबत आदेश देण्यात यावे असे या निवेदनात नमूद केले आहे
.या वेळी प्रहार शिक्षक संघटने सोबत .जि.प.नांदेड चे मुख्यकार्यकारी आधिकारी मा.शरद कुलकर्णी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगून लवकरच आले.प्रामुख्याने आंतरजिल्हा बदली ३१ शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येणार माहिती मलिकार्जुन जोडराणे यांनी दिली आहे आहे
,तसेच सन १९ -२० च्या G.P.F.स्लिप,कंधार तालुक्यातील काही शिक्षकांच्या आयोगातील पाचवा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, त्या अनुसंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही लेखा वित्त आधिकारी कोलगणे यांनी दिली..
.याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन जोडराणे सह ,शिवाजी पा. कपाळे, बालाजी कनशेट्टे ,सुदर्शन पवळे, शिवराज पाटील वडजे, मरशिवणे सर, प्रमोद पाटील, पद्मसिंह जाधव, संजय कुलकर्णी, राजाराम मोरे ,सुभाष राठोड, गंगाराम राऊत ,व आदी उपस्थित होते.