प्रत्येक माणूस आपल्याला सोयीनुसार जात , धर्म आणि त्यानुसार येणारी कर्मकांड यात अडकलेला आहे त्यामुळे जातीधर्माच्या विळख्यात आरक्षणापासून ते जातीचा गर्व या सगळ्याच पापात दिवसेंदिवस गुंतत चाललाय.. मी अमुक एक जातीचा आहे यापेक्षा इथुन पुढे मी माणूस आहे हे सांगायला सुरुवात करायला हवी… आता महाराष्ट्रात चालु असलेलं राजकारण यात तरुण मुलानी लक्ष न घालता शास्त्र जाणुन घेण्यात त्यांचा मौल्यवान वेळ खर्च करावा आणि पालकानी जर भगवद्गीता अध्याय ४ श्लोक १३ पान नं. १८१ . 182 वाचला किवा जाणुन घेतलं तर एका क्षणात जाणवेल कोणाच्या तरी सांगण्यावरुन आपण किती वाईट वागतोय किवा वाईट विचार करतोय.. भगवंताने फक्त चार वर्णात संपूर्ण मानवजात वसवली असताना आपण कोण हे वाईट राजकारण खेळणारे ??.. तो उच्च तो नीच हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला दिला कोणी ??.. माझी सगळ्याना विनंती आहे की दिवाळीच्या खर्चात भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ ॲड करा आणि प्रत्येकाने घरात आणा… सुरुवातीला अधुन मधुन चाळायला लागा.. आपोआप वाचनाची गोडी लागेल आणि इतर गोष्टी बाजूला होतील..
एका कुटुंबात समजा ४ माणसे असतील तर ती चार माणसे वेगवेगळ्या वर्णाची म्हणजे जातीची असु शकतात कारण जात ही प्रत्येकाच्या कर्मानुसार ठरते .. वाचायला थोडं विचीत्र वाटेल पण मी माझ्या मनाचं काहीही सांगत नाही तर जे लिहीलय आणि जे समजून घेतेय तेच तुमच्यापर्यंत पोचवतेय.. एकदा जाणुन घेतल्यानंतर आपण आतुन शांत होतो.. आपण कोणालाही कमी लेखत नाही..
आपण जातीवरुन मारामाऱ्या , दंगे करायला जाणार नाही… आपण फक्त आपलं कर्म करत राहु.. शास्त्र जाणुन घेतलं तर जगणं खूपच सोप्पं आहे त्यामुळे फक्त आनंद आहे.. टीव्हीवरच्या बातम्या पहाण्याआधी हे वाचा मग लक्षात येइल कीती फालतुगिरी सुरु आहे..
जो हे करतो तोच फक्त पापी नाही तर उरलेले आपण सगळे ज्या ह्या बातम्या घरात बसुन चघळतो ते पापापेक्षा वेगळं काहीच असु शकत नाही.. आपण बातम्या पहाताना नकळत घरातुन त्या लोकांबद्दल काहीबाही बोलतो आणि निगेटिव्ह एनर्जी घरात पसरवतो..
त्यापेक्षा हरीनामाने मिळणारं समाधान खूपच सुखद आहे..
जी जाता जात नाही ती जात.. जन्मल्यानंतर लगेचच जन्मपत्रीकेवर चिकटवली जाते ती जात आणि त्यासोबत येणारा गर्व , घमंड , आचारविचार , वृत्ती अशा अनेक गोष्टी आपण आयुष्यभर गरज नसताना पुढे नेतो.. मुलांनाही तेच शिकवतो पण खरं काय आहे हे कोणीही जाणुन घेत नाही म्हणुन श्रीकृष्णाला पुन्हा भगवद्गीता ऐकवावी लागली..
पण ती आपण ऐकली कुठे आणि कधी ??.. ऐकलीही नाही त्यामुळे समजुन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. इस्कॉन चे ol सगळीकडे फ्री क्लासेस असतात जरुर जाणुन घ्या.. कारण वाचून जितकं लक्षात येत नाही तितकं ते श्रवण केल्यावर जास्त लक्षात येतं.. मुलांना काहीनाकाही रोज वाचनाची आवड लावणे आपल्याच हातात आहे..
त्यामुळे मोर्चात मुलं सहभागी न होता पुस्तकात रमतील नाहीतर पुढे काय आहे हे सांगायची गरजच नाही..
सोनल गोडबोले