मौजे.सिरसी (बु).ता.कंधार येथील शेतकरी अतिवृष्टी व गारपीट लाभाच्या अनुदानापासून वंचित ;आत्मदहन करण्याचा इशारा

(प्रतिनिधी,

कैलास शेटवाड )

 कंधार तालुक्यातील मौजे. सिरसी (बुद्रुक) हे गाव एप्रिल-2023 महिन्यामध्ये झालेल्या गारपीटी मध्ये अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून, जवळपास 25% शेतकरी अतिवृष्टी व गारपीटीच्या च्या लाभाच्या अनुदाना पासून वंचित राहिलेले आहेत.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले असून, ज्या शेतकऱ्यांनी त्यांना मावेजा दिला आहे

 

अशाच शेतकऱ्यांची नावे यादीत टाकलेले आहेत असे मा.श्री. सामाजिक कार्यकर्ते व्यंकट गोविंदराव जाधव सिरसी (बुद्रुक) येथील शेतकरी यांनी सांगितलेले आहे .

अनेकदा मा.तलाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या आमचे नुकसान झाले आहे आपन पंचनामे करा पन त्यानी आपली मनमानी केली गावात केव्हा आले कधी गेले व एक ते दोन दिवस मोजक्या शेतकरी यांचे पंचनामे केले व काही शेतकरी यांना वेळोवेळी आज येतो उद्या येतो परवा येतो तुमचे शेत पाहिलो आहे तुमचे यादीत नावे टाकलो असे म्हणून आम्हा सर्व शेतकऱ्यांना उडवा ऊडविचे उत्तरे देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले असून,

ज्या शेतकऱ्यांनी त्यांना मावेजा दिला आहे अशाच शेतकऱ्यांची नावे यादीत टाकलेले आहेत असे मा.श्री. सामाजिक कार्यकर्ते व्यंकट गोविंदराव जाधव सिरसी (बुद्रुक) येथील शेतकरी यांनी सांगितलेले

आहे.व उर्वरित खरे शेतकरी गारपिटीच्या अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या 25 टक्के. लाभार्थ्यांना मा.तहसीलदार साहेबांनी प्रत्यक्षात येऊन चौकशी करून सिरशी (बुद्रूक) ता.कंधार येथील शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांचे गारपीटीच्या यादीमध्ये नाव नाही अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांची चौकशी करून व उर्वरित लाभापासून वंचित राहिलेल्या पूर्ण लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. तरी या अगोदर मा.जिल्हाधिकारी साहेब कार्यालय नांदेड यांनी दि.11 ऑक्टोबर 2023 रोजी मा.तहसीलदार साहेब कंधार यांना तसा आदेश देण्यात आला होता तरी यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. व्यंकट जाधव मा.श्री.पांडुरंग जाधव . (ग्रामपंचायत सदस्य) विजय माला भाऊसाहेब येडे,मधुकर येडे व एकूण 11 शेतकरी यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात भेट देऊन विनंती पत्र दिले होते.तरी अजूनही आम्हाला आमच्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांची चौकशी करून आम्हाला एप्रिल महिन्यात 2023 च्या गारपीटी पासून वंचित ठेवले आहे असे मा.श्री. व्यंकट जाधव यांनी सांगितलेले आहे.व तात्काळ न्याय द्यावा अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे नांदेड कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू व तसेच वेळे- प्रसंगी आम्हाला न्याय न मिळाल्यास व कार्यवाही न केल्यास आम्ही कंधार तहसील कार्यालयात येऊन आत्मदहन करू असे सांगितले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *