… डायरेक्ट भगवदधाम .. मग व्हाया व्हाया का ??.

… डायरेक्ट भगवदधाम .. मग व्हाया व्हाया का ??..
लहानपणापासून आपण अनेक साधु संत , देवी देवता , यांच्याबद्द्ल ऐकत आलो .. वाचत आलो .. पण माझ्यासकट अनेकांना एक प्रश्न कधीही पडला नाही आणि त्यामुळेच जे जे सांगतील ते ते ब्लाइंडली आपण फॉलो करत आलो.. कधी घरच्यांनी सांगितले म्हणुन तर कधी इतरांचे अनुभव म्हणुन..
लहानपणापासून आपण ऐकत आलो.. सगळ्याचा ईश्वर एकच मग तो नक्की कोण ?? .. हाही प्रश्न पडला नाही आणि जेव्हा कधी कोणाला पडला असेल तेव्हा त्याचं समाधानकारक उत्तर कधी मिळालं नाही कारण शास्त्राचा अभ्यास नाही आणि भगवंताबद्द्ल बोलण्याची आपली योग्यताही नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न निरुत्तरीतच राहिले.. मी कॉलेजला असताना अशा काही लोकांना ब्लाइंडली फॉलो करत होते त्यामुळे माझं काही नुकसान झालं का तर अजिबात नाही पण मला अर्धवट ज्ञान मिळालं.. आपल्याला ब्रह्म ज्योतीत विलीन व्हायचय किवा त्या तेजात विलीन व्हायचय हे समजलं पण ते तेजाच्या मागे भगवंत आहे हे मला आता आता समजलं .. उदाहरण द्यायचं झालं तर नागपूरला जायला डायरेक्ट विमान किवा बस आहे ती न घेता आपण व्हाया व्हाया जात रहातो आणि विनाकारण पैसा आणि वेळ वाया घालवतो.. मग ज्यानी डायरेक्ट हा प्रवास केला आहे त्यांनी इतरांना योग्य ती माहीती पुरवली तर त्या व्यक्तीचा वेळ वाचेल आणि त्याला योग्य दिशा मिळेल.. तसच अध्यात्माचं आहे ज्याने खरच जर भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत वाचलं असेल आणि खऱ्या भगवंताला जाणलं असेल त्यांनी इतरांना भगवदधामाचा मार्ग दाखवावा नाहीतर समाज चुकीच्या विचारांना फॉलो करतो.. माणसाला देव मानतो आणि भगवंताचा अपमान करतो.. देव सुध्दा जर भगवंताच्या आज्ञेनुसार काम करत असतील तर आपणही दोन्हीतील फरक जाणून हरीनाम घेउन भगवंताने घालून दिलेल्या नियमात राहुन भगवद्धामाची डायरेक्ट प्राप्ती करु शकतो. शास्त्र समजून घेण्याचा आणि त्यानुसार वागण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे… सरश्री ( Happy thoughts ) सुध्दा आपल्याला विचार कसे असावेत किवा निगेटीव्हीटी पॉझीटीव्हीटी मधे कशी बदलावी हे सांगतात ते स्वतःला देव म्हणत नाहीत आणि भगवंताविषयी उलटसुलट चर्चाही करत नाहीत.. मी सुध्दा अनेकांना फॉलो करते पण भगवंत आहे आणि तो एकच आहे हाचविचार डोक्यात ठेउन नाहीतर अंधश्रध्देला खतपाणी घाटलं जाईल .. आपण अभ्यासानुसार योग्य व्यक्तीकडुन आध्यात्मिक ज्ञान घ्यायचे आहे आणि तेच योग्य लोकांनाही द्यायचे आहे.. इथे जाती धर्माचा काहीही संबंध नाही.. आपण फक्त आणि फक्त माध्यम आहोत हाच भाव मनी असायला हवा नाहीतर स्वैरपणे वागणं अहंकाराला आमंत्रण दिल्यासारखं आहे.. चमकणारा प्रत्येक दगड हिरा नसतो तसच समाजात अपप्रचार परसवणाऱ्याने पुढच्या परिणामांचा जरुर विचार करावा आणि विनाकारण पाप ओढवुन घेउ नये.. जे अस्सल आहे ते ओळखावं आणि त्यातुन मिळणारा आनंद हा शाश्वत आहे हे जाणावं कारण भौतिक गोष्टीत मिळणारा आनंद क्षणिक आहे.. मी प्रसाद खाते हे वाक्य आणि मी जेवते हे वाक्य ह्या दोन्ही वाक्यात खूप मोठा फरक आहे.. त्याची थट्टा उडवत नॉनव्हेज कसं चांगलं किवा चमचमीत खाल्ल्याशिवाय माझं समाधान होत नाही , काय ते घासपुस खायचं किवा पानचट जेवण असं बोलून आपण भगवंताचा अपमान करतो कारण प्रसाद या शब्दाचा अर्थ *साक्षात प्रभुचे दर्शन *असा आहे.. रोज प्रसाद खाणारी व्यक्ती ही सात्विक बनते.. त्याचे विचार हे कायम उच्च असतात.. त्याला राग येत नाही.. तो कोणाचा द्वेष करत नाही .. कोणाबद्दल असुया नाही.. आणि जो भगवंताला जाणतो तो कायम आनंदी आणि समाधानी रहातो.. कारण त्याला कशाची भीती नसते.. आपल्या प्रत्येकाला भगवंताच्या धामात जायचा मार्ग मोकळा आहे फक्त वाटेत भुरटे भेटतील जे कदाचित तुम्हाला मिसगाईड करतील .. कधी कधी गुगल बाई पण आपल्याला गंडवते पण आपलं लक्ष फक्त आणि फक्त त्या मार्गावर असेल तर कितीही दुष्ट प्रवृत्ती येवोत आपण योग्य ठिकाणी पोचणारच.. आणि अशा खऱ्या आणि चांगल्या व्यक्तीला भगवंत मदत करतो..
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे..
#SonalSachinGodbole

#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *