कंधार (प्रतिनिधी)
दि. २९ एप्रिल रोजी लातूर येथे होणाऱ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला कंधार लोहा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन उदगीरचे माजी आ. गोविंदअण्णा केंद्रे यांनी केले आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार व भाजप उमेदवार सुधाकरराव श्रंगारे यांच्या प्रचारार्थ दि. २९ एप्रिल २०२४ रोजी लातूर येथे सभा आयोजित केली आहे. सध्या भाजपा उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी केलेली कामे,वाटप केलेला निधी, त्यांचा असलेला कार्यकर्त्यांशी संपर्क,त्यांचे राहणीमान व देशात असलेले भाजपमय वातावरण या जोरावर परत एकदा खासदारकी मिळवायला त्यांना अडचण येणार नाही असे जाणकार सांगतात.
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे प्रचाराचे नियोजन मतदार संघातील सर्व या सगळ्या गोष्टी अतिशय नियोजनपूर्वक असल्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रचारात आघाडी घेत आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ मंडळी मोसक्याच ठिकाणी प्रचार सभा घेत असल्याने काही ठिकाणच्या उमेदवारांना याची अडचण होत आहे फक्त जिल्ह्यातील किंवा मतदारसंघातील नेते मंडळी प्रचारात दिसून येत आहेत परंतु याचा प्रभाव म्हणावा तेवढा होत नाही म्हणून काँग्रेसची प्रचार यंत्रणा ही कमकुवत दिसून येत आहे
गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने ग्रामीण भागातील मतदारापर्यंत योजना पोहोचविल्यामुळे ग्रामीण मतदार आजही मोदी सरकारच्या पाठीमागे असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना रासपा व रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते जीव तोडून प्रचार करत आहेत .यात माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर ,आमदार रमेश आप्पा कराड ,विद्यमान मंत्री संजयजी बनसोडे , आ. बाबासाहेब पाटील यासारखी मातब्बर मंडळी तन-मन-धनासह प्रचार करत आहेत सोबतच राज्य पातळी व देश पातळीवरील नेते मंडळी प्रचाराला येत असल्याने शृंगारे यांचे पारडे जड दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेसची मोजकीच मंडळी प्रचार करत असल्याने उमेदवाराला घाम फुटत आहे.
दि. २९ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लातूरला येत असून त्यांना ऐकण्यासाठी लोहा कंधार तालुक्यातील जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे माजी आ. गोविंद अण्णा केंद्रे यांनी आवाहन केले.