अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज सादलापुरे यांच्या शंभुराजे पेट्रोलियमचा शुभारंभ

 

 

फुलवळ ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील शासकीय कंत्राटदार वैजनाथराव सादलापुरे यांच्या शंभुराजे पेट्रोलियम या नवीन पेट्रोल पंपाचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज दि १० मे रोजी होणार आहे.

या निमित्ताने सकाळी ११ : ०० वाजता श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात येणार आहे.पुजेनंतर दुपारी एक ते संध्याकाळी ठीक सहा वाजेपर्यंत कलंबर रोडवरील मौजे नवघरवाडी येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळ स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान आज दि १० मे 24 रोजी विजयकुमार सादलापुरे यांचा वाढदिवस आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *